उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. या वेळी कुटुंबीयांनी महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी अजित पवारांनीही याबाबत मी त्यांना विचारणार असल्याचे सांगितले. तसेतच मुख्यमंत्र्यांशी देखील या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, रूपाली चाकणकर यांच्या मताशी आम्ही सहमत नाहीत. या संदर्भात आम्ही- रूपाली चाकणकर यांना विचारणा करणार आहे. त्यांच्या मताचे कोणीही आम्ही समर्थन करनार नाही. तसेच त्यांनी असं का केलं याचं कारण विचारणार आहे.
advertisement
महिला आयोग्याध्यक्षांच्या भूमिकेवरचं सवाल
फलटणधील डॉक्टर तरुणीनं आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं होतं. पीएसआय गोपाळ बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचं त्यात उल्लेख आहे. तर प्रशांत बनकरनं मानसिक छळ केल्याचं तरुणीच्या हातावरील मजकुरात आढळून आलंय. या दाव्यानंतर विरोधकांनी चाकणकरांवर सडकून टीका केलीय. तसेच महिला आयोग्याध्यक्षांच्या या प्रकरणातील भूमिकेवरचं सवाल उपस्थित केलाय. मृत्यूनंतर त्या मुलीचं आयोगाकडून चारित्र्यहनन का ?पोलीस यंत्रणेवर संशय असताना त्यांनी दिलेले पुरावे का ग्राह्य धरावेत ? असा सवाल उपस्थित होत आहे.
चाकणकरांच्या भूमिकेवर सवाल
पोलीस आणि राजकारण्यांकडून दबाव टाकला जात असल्याचं डॉक्टर तरुणीच्या लेखी तक्रारीतून समोर आलं आहे. पण तिचा तो मुद्दाही चाकणकरांनी खोडून काढला.तर दुसरीकडे चाकणकरांच्या या पत्रकार परिषदेवरच सुषमा अंधारेंनी जोरदार आक्षेप घेतला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना यापूर्वीही टीकेचं धनी व्हावं लागलं आहे. वैष्णवी हगवणे, तनिषा भिसे प्रकरणातही विरोधकांनी त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला होता. आता फलटण प्रकरणातही त्या विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत.
