Bird Sounds : असा चहावाला पाहिला नसेल! पक्षांचा काढतो हुबेहूब आवाज, VIDEO पाहून कराल कौतुक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
हुसेन पानगल हे पक्षांचे विविध आवाज काढतात. मिमिक्री करत चहा बनवून विक्री करण्याचं काम गेल्या पंधरा वर्षांपासून ते करत आहेत.
सोलापूर : अनेकांना वेगवेगळे छंद असतात. सोलापूर शहरातील बागवान नगरमध्ये राहणारे 40 वर्षीय हुसेन पानगल हे पक्षांचे विविध आवाज काढतात. मिमिक्री करत चहा बनवून विक्री करण्याचं काम गेल्या पंधरा वर्षांपासून ते करत आहेत. हा छंद हुसेन यांना कसा लागला या संदर्भात अधिक माहिती हुसेन यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
सोलापूर शहरातील बागवान नगर येथे हुसेन पानगल राहण्यास आहेत. तर सोलापुरातील सिद्धेश्वर पेठेत असलेल्या सिद्धेश्वर टी हाऊसमध्ये चहा बनवण्याचं काम हुसेन करत आहेत. चहा बनवत बनवत ग्राहकांना विविध पक्षांचे तसेच कलाकारांचे आवाजांची मिमिक्री करत चहा देण्याचं काम हुसेन करत आहेत.
advertisement
चिमणी, कुत्रा, ॲम्ब्युलन्स, टेलिफोन, तसेच विविध कलाकारांचे आणि ॲनिमेशन कलाकारांचे आवाज काढण्याचं काम हुसेन करत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून विविध आवाजाची मिमिक्री करत चहा बनवून देण्याचं काम हुसेन पानगल करत आहेत. तर काही ठराविक ग्राहक फक्त हुसेन कडून कलाकारांचे आवाज ऐकण्यासाठी चहा पिण्यासाठी येतात.
गेल्या 15 वर्षांपासून हुसेन आवाजाची मिमिक्री करत आहेत. सिद्धेश्वर कॅन्टीन हे एका शाळेपासून जवळ असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी हुसेन कडून मोटू पतलूचा आवाज ऐकण्यासाठी मधल्या सुट्टीमध्ये किंवा शाळा सुटल्यावर येतात. तर लोकांचं मनोरंजन करत करत चहा विक्रीतून दिवसाला 450 ते 500 रुपयांची कमाई हुसेन पानगल करत आहेत. लोकांना हसवत हसवत काम करण्यात एक वेगळीच मजा मिळते म्हणून मिमिक्री करत चहा बनवून देण्याचं काम हुसेन पानगल करत आहेत.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
October 30, 2025 3:39 PM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
Bird Sounds : असा चहावाला पाहिला नसेल! पक्षांचा काढतो हुबेहूब आवाज, VIDEO पाहून कराल कौतुक

