अद्वितीय उदाहरण! चक्क गॅरेजमध्ये गोमातेसाठी भोजनालय; दररोज गायींसाठी अन्नदान, सोलापुरातील हृदयस्पर्शी सेवा

Last Updated:

भारतीय संस्कृतीच नाही तर संपूर्ण जगात गोमातेचा मोठा सन्मान केला जातो. हाच धागा पकडून सोलापूर शहरातील पूर्व मंगळवार पेठेत आस्था सामाजिक संस्थेने एका गॅरेजमध्ये चक्क गोमातेसाठी अन्नछत्र उघडले आहे.

+
मुक्या

मुक्या जनावरांची सेवा; थेट गॅरेजमध्ये येऊन खातात चपात्या

सोलापूर: भारतीय संस्कृतीच नाही तर संपूर्ण जगात गोमातेचा मोठा सन्मान केला जातो. हाच धागा पकडून सोलापूर शहरातील पूर्व मंगळवार पेठेत आस्था सामाजिक संस्थेने एका गॅरेजमध्ये चक्क गोमातेसाठी अन्नछत्र उघडले आहे. दररोज 8 ते 10 गायी थेट गॅरेजमध्ये येतात अन् चपात्या खाऊन परतात. या संदर्भात अधिक माहिती आनंद तालीकोटी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
आस्था सामाजिक संस्था वंचित गोरगरीब लोकांना दररोज दोन वेळचा जेवण पुरवण्याचं काम करत असते. त्याचबरोबर मंगळवार पेठेत आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी ह्यांनी गेल्या 4 वर्षापासून गॅरेजमध्ये गाईंसाठी अन्नछत्र उघडले आहे. सोलापुरातील सिद्धेश्वर बँकेजवळ टू- व्हीलर गॅरेजमध्ये गोमातेसाठी ही सेवा सुरू केली. सिद्धेश्वर हौसिंग सोसायटीत राहणारे आनंद दररोज सकाळी घरातून बाहेर पडताना 40 ते 50 चपात्या सोबत घेतात.
advertisement
त्यांच्या पत्नी सुजाता या न चुकता चपात्या बनवतात अन् आनंद तालीकोटी यांच्या हातात देऊन गोमातेची सेवा बजावतात. गॅरेजमध्ये कितीही काम असले तरी आनंद हे गाईंना अन्नदान केल्याशिवाय राहत नाही. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी या तिन्ही वेळेस गायींना चपात्या खाण्यासाठी दिले जातात. तसेच नागरिकांकडून दिलेल्या भाजीपाला देखील या ठिकाणी गाईंना खाण्यासाठी दिला जातो. आस्था सामाजिक संस्थेकडून गरजू लोकांना जेवणासाठी अन्न दिला जातो. त्याच पद्धतीने मुक्या प्राण्यांना देखील अन्न मिळावं म्हणून आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी यांनी ही सेवा सुरू केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अद्वितीय उदाहरण! चक्क गॅरेजमध्ये गोमातेसाठी भोजनालय; दररोज गायींसाठी अन्नदान, सोलापुरातील हृदयस्पर्शी सेवा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement