Pune : मला आई बनव, 25 लाख देईन..., 'प्रेग्नंट जॉब'ला भाळला, पुण्याचा कंत्राटदार आयुष्यातून उठला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पुण्यातल्या एका 44 वर्षीय कंत्राटदाराचं आयुष्य सोशल मीडियावरच्या एका व्हिडिओमुळे उद्ध्वस्त झालं आहे. महिलेच्या प्रेग्नंट करण्याच्या आमिषाला हा कंत्राटदार बळी पडला.
पुणे : पुण्यातल्या एका 44 वर्षीय कंत्राटदाराचं आयुष्य सोशल मीडियावरच्या एका व्हिडिओमुळे उद्ध्वस्त झालं आहे. 'मला असा पुरुष हवा आहे, जो मला आई बनवू शकेल, त्याला मी 25 लाख रुपये देईन. मला त्याची जात, रंग किंवा शिक्षणाची पर्वा नाही', असं एक महिला व्हिडिओमध्ये म्हणत होती.
हा व्हिडिओ 'प्रेग्नंट जॉब' नावाच्या एका पेजवर पोस्ट करण्यात आला होता. कंत्राटदाराला सुरूवातीला हा व्हिडिओ विचित्र वाटला, पण 25 लाख रुपयांच्या ऑफरला भाळून त्याने व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल केला.
कंपनीच्या नावाने सुरू झाली फसवणूक
फोनवर उत्तर देणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख प्रेग्नंट जॉब कंपनीत असिस्टंट म्हणून करून दिली. तसंच त्याने कंत्राटदाराला या कामासाठी प्रथम कंपनीत नोंदणी करायला लागेल, यानंतर ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रेही दिली जातील, असंही सांगितलं, यानंतर पैशांचा खेळ सुरू झाला. पहिले नोंदणी शुल्क, त्यानंतर ओळखपत्र शुल्क, पडताळणी शुल्क, जीएसटी, टीडीएस, प्रक्रिया शुल्क, अशी प्रत्येक वेळी नवीन कारणं सांगितली गेली.
advertisement
100 पेक्षा जास्त व्यवहारांमध्ये कंत्राटदाराने 11 लाख रुपये गमावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदाराने सप्टेंबरचा पहिला आठवडा ते 23 ऑक्टोबरदरम्यान 100 पेक्षा अधिकवेळा पैसे ऑनलाइन ट्रान्सफर केले, यात UPI आणि IMPS व्यवहारांचा समावेश होता. सुरूवातीला कंत्राटदाराला सर्वकाही प्रक्रियेनुसार सुरू असल्याचं सांगण्यात आलं आणि तो लवकरच महिलेला भेटेल, असं आश्वासनही दिलं गेलं, पण काही काळानंतर त्याला ब्लॉक करण्यात आलं.
advertisement
पोलीस स्टेशनला तक्रार
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, कंत्राटदाराने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता ज्या मोबाईल नंबरवर आणि बँक खात्यांवर पैसे पाठवले होते त्यांची चौकशी सुरू केली आहे. 'ही फसवणूक केवळ पुण्यापुरती मर्यादित नाही. देशाच्या अनेक भागात असे प्रकार घडत आहेत. सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ पोस्ट करून लोकांना मोठ्या प्रमाणात पैशांचे आमिष दाखवले जाते आणि नंतर वेगवेगळ्या नावांनी खंडणी वसूल केली जाते', असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
advertisement
देशभरात प्रेग्नन्सी जॉब स्कॅम
सायबर तपासकर्त्यांचे म्हणणे आहे की 2022 च्या अखेरीपासून देशभरातील अनेक राज्यांमध्ये असे फसवे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांमध्ये अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. काही प्रकरणांमध्ये, फसवणूक करणारे "प्रेग्नंट जॉब सर्व्हिस" किंवा "मदरहूड जॉब एजन्सी" सारख्या नावांनी स्वतःची ओळख करून देतात. महिलांच्या क्लिप्स व्हिडिओमध्ये टाकल्या जातात जेणेकरून असे दिसून येईल की त्या खरोखरच गर्भधारणेसाठी मदत करण्यासाठी पुरुष शोधत आहेत. नंतर, प्रकरण नोंदणी आणि वैद्यकीय चाचणी शुल्कापर्यंत जाते. पैसे मिळाल्यानंतर, फसवणूक करणारे पळून जातात.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 30, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : मला आई बनव, 25 लाख देईन..., 'प्रेग्नंट जॉब'ला भाळला, पुण्याचा कंत्राटदार आयुष्यातून उठला!


