काँग्रेसच्या बड्या नेत्याला आयकर विभागाची नोटीस, गडचिरोलीच्या सभेतच सांगितले

Last Updated:

मोर्चा झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांतच त्यांना आयकर विभागाची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Congress Leader
Congress Leader
गडचिरोली : ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणासाठी आंदोलन छेडणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मागे आयकर विभागाचा ससेमिरा लागला आहे. विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस धाडली आहे. सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
ओबीसी नेत्यांनी नागपूर येथे सरकारला धडकी भरवणारा विराट ओबीसी मोर्चा काढला होता. या मेळाव्यात विजय वडेट्टीवार यांनी अतिशय आक्रमक मांडणी केली होती. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य करतानाच राज्य सरकारवर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. मोर्चा झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांतच त्यांना आयकर विभागाची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
advertisement
गडचिरोलीतील एका सभेत बोलताना आपल्याला आयकर विभागाची नोटीस आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. आयकर विभागाची नोटीस आलेली असली तरी मी मागे हटणार नाही. सरकारविरोधात पुकारलेला लढा मी सुरूच ठेवेन. माझ्यावर राजकीय सुडापोटी कारवाया करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काँग्रेसच्या बड्या नेत्याला आयकर विभागाची नोटीस, गडचिरोलीच्या सभेतच सांगितले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement