IND vs AUS : 23 मार्च 2003 ला सचिनसोबत झालं तेच 23 वर्षांनी हरमनच्या नशिबी, ऑस्ट्रेलियाने जुन्या जखमेवर मीठ चोळलं!

Last Updated:

23 मार्च 2003 ला सचिन तेंडुलकरसोबत जे झालं, तेच 23 वर्षांनी हरमनप्रीत कौरसोबत होणार का? याचं कारण म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांच्या जुन्या कटू आठवणी ऑस्ट्रेलियाने पुन्हा ताज्या केल्या आहेत.

23 मार्च 2003 ला सचिनसोबत झालं तेच 23 वर्षांनी हरमनच्या नशिबी, ऑस्ट्रेलियाने जुन्या जखमेवर मीठ चोळलं!
23 मार्च 2003 ला सचिनसोबत झालं तेच 23 वर्षांनी हरमनच्या नशिबी, ऑस्ट्रेलियाने जुन्या जखमेवर मीठ चोळलं!
नवी मुंबई : 23 मार्च 2003 ला सचिन तेंडुलकरसोबत जे झालं, तेच 23 वर्षांनी हरमनप्रीत कौरसोबत होणार का? याचं कारण म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांच्या जुन्या कटू आठवणी ऑस्ट्रेलियाने पुन्हा ताज्या केल्या आहेत. भारताविरुद्धच्या महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दणक्यात सुरूवात केली आहे. पहिल्या 27 ओव्हरमध्येच ऑस्ट्रेलियाने 181 रनचा टप्पा गाठला आहे. फोबे लिचफिल्डने 93 बॉलमध्ये 119 रनची खेळी केली, ज्यात तिने 17 फोर आणि 3 सिक्स मारल्या.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर क्रांती गौडने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली 5 रनवरच आऊट झाली. पण त्यानंतर लिचफिल्डने एलिस पेरीच्या मदतीने भारताच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. क्रांती गौडला एक विकेट मिळाली असली तरी लिचफिल्ड आणि पेरीने क्रांतीच्या 5 ओव्हरमध्ये 49 रन काढल्या.
advertisement

जुन्या जखमा ताज्या झाल्या

याआधी 2003 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय बॉलिंगवर अशाचप्रकारे आक्रमण केलं होतं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉण्टिंगने 121 बॉलमध्ये 140 रनची नाबाद खेळी केली, तर डॅमियन मार्टिन 84 बॉलमध्ये 88 रनवर नाबाद राहिला. ऍडम गिलख्रिस्टने 57 आणि मॅथ्यू हेडनने 37 रन केले होते. पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये फक्त 2 विकेट गमावून 359 रन केले आणि भारताने हा सामना तब्बल 125 रनने गमावला होता.
advertisement
आता 23 वर्षांनंतर लिचफिल्डने रिकी पॉण्टिंगसारखीच खेळी केली आहे, त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा 23 मार्च 2003 च्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : 23 मार्च 2003 ला सचिनसोबत झालं तेच 23 वर्षांनी हरमनच्या नशिबी, ऑस्ट्रेलियाने जुन्या जखमेवर मीठ चोळलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement