ना पैशांची मागणी, ना कोणती अट, १७ मुलांना ओलीस का ठेवलं? किडनॅपरचं सरकारी कॉन्ट्रॅक्टचं लफडं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मी दहशतवादी नाही तसेच पैशाची मागणी केलेली नाही, मला फक्त काही लोकांशी बोलायचे असे आरोपी वारंवार व्हिडीओमध्ये सांगत होता.
मुंबई : पवई परिसरातील एका स्टुडिओमध्ये दिवसाढवळ्या सुमारे १५ ते २० मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याने दहशत निर्माण झाली. ओलीस ठेवल्यानंतर काही वेळातच पोलिसांना सर्व मुलांना सोडवण्यात यश आले. अनेक मुले स्टुडिओच्या काचेच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावताना दिसली त्यानंतर पोलिसांना तक्रार करण्यात आली. रा स्टुडिओमध्ये ही घटना घडली आहे.
रोहित आर्य असे आरोपीचे नाव आहे. तो नागपूरच्या शाळेचा प्राध्यपक आहे. पैसे अडकल्याने ते मिळवण्यासाठी रोहितने हे पाऊल उचलले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुलांना ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीची ओळख रोहित आर्य म्हणून झाली आहे, जो स्टुडिओमध्ये कर्मचारी आहे आणि तो एक यूट्यूब चॅनेल देखील चालवतो. गेल्या चार ते पाच दिवसांपासून, रोहित परिसरात ऑडिशन्स घेत होता. गुरुवारी सकाळी, जेव्हा जवळजवळ १०० मुले ऑडिशन्ससाठी आली तेव्हा त्याने सुमारे ८० मुलांना बाहेर जाण्याची परवानगी दिली परंतु १५ ते २० मुलांना आतच कोंडून ठेवले
advertisement
सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांने मुलांना ओलीस का ठेवल्याचे कारण सांगितले आहे. काही लोकांशी जबरदस्तीने संभाषण करण्यासाठी मुलांना ओलीस ठेवले होते. त्याच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना, त्याने सांगितले की त्याच्याकडे मोठ्या आर्थिक मागण्या नाहीत आणि त्याच्या मागण्या "नैतिक" होत्या
तो म्हणाला की त्याला प्रश्न विचारायचे आहेत आणि उत्तरे मिळवायची आहेत, आणि तो स्वतःला दहशतवादी मानत नाही असेही त्याने सांगितले. कोणत्याही आक्रमक हालचालीमुळे तो चिथावणी देऊ शकतो असा इशाराही त्याने दिला आणि अधिकाऱ्यांना आणि इतरांना त्याला उत्तेजित करू नका असे आवाहन केले.
advertisement
नेमकं काय आहे कारण?
आरोपीचे काही पैसे सरकारी प्रोजेक्टमध्ये लावले होते. त्याने कोट्यवधीची गुंतवणूक केली होती, मात्र त्याचे नुकसान झाले. नुकसानासाठी त्याने सरकारला जबाबदार ठरवले होते. यामुळे त्यानी आपली बाजू सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. या व्यक्तीने नागपूरमध्ये स्वच्छचा मोहीम राबवली होती. त्यावेळी 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी हा निधी त्याला त्यावेळी मिळाला नाही. मात्र त्याने स्वखर्चाने ६० ते ७० लाख रुपये खर्च केला. हा निधी न मिळाल्याने आर्या आंदोलन करत होता. त्याने याआधी आझाद मैदानात देखील आंदोलन केलं होतं
advertisement
रोहितला कोणाशी बोलायचे होते?
view commentsमी दहशतवादी नाही. माझी पैशाची मागणी केलेली नाही. अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेक वेळा भेटून झाले. आंदोलन देखील केले, मात्र माझी दखल घेतली जात नाही. माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंदी बनवलं आहे, असं रोहित आर्यने म्हटलं आहे. मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 5:09 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ना पैशांची मागणी, ना कोणती अट, १७ मुलांना ओलीस का ठेवलं? किडनॅपरचं सरकारी कॉन्ट्रॅक्टचं लफडं


