भारताला मिळणार नवी नॅशनल क्रश! अगस्त्य नंदासोबत लिपलॉक करणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारशी खास कनेक्शन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ikkis Movie Trailer : अगस्त्य नंदाचा आगामी सिनेमा 'इक्कीस'मध्ये दिसणाऱ्या नव्या चेहऱ्याने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीचं बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत खास कनेक्शन आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या नवनवीन सिनेमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. अशातच एका चित्रपटातून एक नवा चेहरा बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी तयार झाला आहे. नुकतंच सैयारा या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं होतं. यात प्रेक्षकांना अहान पांडे आणि अनीत पड्डा ही नवी कोरी जोडी पाहायला मिळाली होती. आता आणखी एक नवा चेहरा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा त्याचं बिग स्क्रीन डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. अगस्त्यने झोया अख्तरच्या द आर्चीज सिनेमातून त्याचं ॲक्टिंग डेब्यू केलं होतं. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. अशातच सेकेंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित बायोपिक इक्कीसमध्ये अगस्त्य मुख्य भूमिकेत पाहायला मिळेल. अरुण खेत्रपाल यांनी १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धात अनन्यसाधारण साहस दाखवले होते. त्यावेळी ते केवळ २१ वर्षांचे होते. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना मरणोत्तर देशाचे सर्वोच्च सैन्य सन्मान परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आले होते.
advertisement
अगस्त्य नंदाचं बिग स्क्रीन डेब्यू
काही तासांपूर्वीच या सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी चित्रपटात दिसणाऱ्या नव्या चेहऱ्याने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीचं बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत खास कनेक्शन आहे. अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ती ज्येष्ठ दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या आगामी 'इक्कीस' या युद्धावर आधारित सिनेमांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करत आहे. भाचीच्या डेब्यूवर मामा अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक खास आणि भावूक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
advertisement
advertisement
लाडक्या भाचीसाठी अक्षय कुमारची खास पोस्ट
अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर 'इक्कीस' चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आणि सिमरसाठी एक खास नोट लिहिली. अक्षय कुमारने लिहिले, "माझी छोटी सिमी आता लहान राहिली नाही!... #इक्कीस मध्ये तुझ्या 'लिव्ह्हिंग रूम परफॉर्मन्स'पासून ते मोठ्या पडद्यापर्यंतचा हा प्रवास पाहून माझे हृदय अभिमानाने भरले आहे! @simarbhatia18. आणि अगस्त्य, काय स्क्रीन प्रेझेंस आहे! संपूर्ण टीमला खूप यशासाठी शुभेच्छा देतो."
advertisement
मामाच्या या शुभेच्छांना सिमरनेही तितकेच प्रेमळ उत्तर दिले. तिने ही स्टोरी शेअर करत लिहिले, "तुमच्यासाठी मी नेहमीच छोटी सिमी राहीन. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. खूप प्रेम!" सिमर भाटिया ही अक्षय कुमारची बहीण आणि चित्रपट निर्मात्या अलका भाटिया यांची मुलगी आहे.
कधी रिलीज होणार फिल्म?
सिमरचा डेब्यू चित्रपट 'इक्कीस' हा एक अत्यंत महत्त्वाची वॉर फिल्म आहे. ही कथा भारताचे सर्वात कमी वयाचे परमवीर चक्र विजेते, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या शौर्यावर आधारित आहे. युद्धाच्या वेळी अरुण खेत्रपाल यांचे वय केवळ २१ वर्षे होते.
advertisement
ट्रेलर रिलीज करताना 'तो इक्कीसचा होता, इक्कीसचाच राहील!' अशी टॅगलाइन दिली आहे. या चित्रपटात अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे, तर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अरुण खेत्रपाल यांच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत. तसेच, जयदीप अहलावत एका सेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, या वर्षी डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 4:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
भारताला मिळणार नवी नॅशनल क्रश! अगस्त्य नंदासोबत लिपलॉक करणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारशी खास कनेक्शन


