Maruti Wagon R आता विसरा, तिच्यापेक्षा आली छोटी Car, लूक पाहून पडाल प्रेमात!
- Published by:Sachin S
Last Updated:
काही वर्षांमध्ये येणाऱ्या ईव्ही कारची ही एक नवीन जनरेशन असणार आहे. सुझुकीने या कारला जस्ट राइट मिनी कारचं रुप दिलं आहे.
जपानी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या सुझुकीने जपानी मोबिलिटी शो 2025 मध्ये Suzuki Vision e-Sky BEV ही कन्सेप्ट कार लाँच केली आहे. आगामी काही वर्षांमध्ये येणाऱ्या ईव्ही कारची ही एक नवीन जनरेशन असणार आहे. सुझुकीने या कारला जस्ट राइट मिनी कारचं रुप दिलं आहे. ही सुविधा, परफॉर्मन्स आणि पर्सनालिटीला अगदी बॅलेन्स करतेय. ही इतकी छोटी कार आहे जी रोजच्या ऑफिस प्रवासासाठी एकदम बेस्ट आहे. 2026 मध्ये ही कार लाँच केली जाणार आहे.
advertisement
advertisement
डिझाइन - Suzuki Vision e-Sky ला हटके असा लूक दिला आहे. या कारच्या फ्रंटवर मॅट्रिक्स-स्टाईलची LED लाईट बार आहे, ज्याच्या दोन्ही बाजूंना C-आकाराचे DRLs डेटाइम रनिंग लाईट्स आणि मुख्य हेडलाईट्स आहेत. याची रचना सरळ-उभी आहे, ज्यामुळे आत बसलेल्यांना अधिक हेडरूम मिळेल. बाजूला फ्लश डोअर हँडल्स, एरोडायनॅमिक विंग मिरर्स आणि एक फ्लोटिंग C-पिलर याला आधुनिक स्पर्श देतात.
advertisement
Vision e-Sky ची लांबी 3,395mm, रुंदी 1,475mm आणि उंची 1,625mm इतकी आहे. विशेष म्हणजे, या Vision e-Sky ची उंची ही Maruti Suzuki S-Presso पेक्षा जास्त आहे. पण लांबी आणि रुंदीमध्ये एस-प्रेसोपेक्षा लहान आहे. तिचा हा कॉम्पॅक्ट आकार जपानच्या 'केई कार (Kei car)' नियमांनुसार आहे, ज्यामुळे ती भारतासारख्या गर्दीच्या शहरांसाठी देखील एक बेस्ट ऑप्शन बनू शकतो.
advertisement
Vision e-Sky मध्ये आतमध्येही उत्तम असं इंटिरियर केलं आहे. या Vision e-Sky मध्.े 'स्क्विरकल' चौकोनी आकाराचे स्टीअरिंग व्हील आहे, ज्यावर मल्टी-फंक्शन बटणं दिली आहेत. ड्रायव्हरसाठी दोन डिजिटल स्क्रीन आहेत. एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी जी बॅटरी चार्ज, रेंज आणि स्पीड (गती) यासारखी माहिती दर्शवते आमि दुसरी इन्फोटेनमेंटसाठी. यात फ्लोटिंग डॅशबोर्ड डिझाइन आहे.
advertisement
advertisement
advertisement
भारतात कधी लाँच होणार? Vision e-Sky ही एक कन्सेप्ट एंट्री-लेव्हल कार आहे. मारुती इलेक्ट्रिक ही कार भारतात लाँच करू शकते अशी शक्यता आहे. कारण, भारतात या साईजमध्ये आधीच Tata Tiago EV आणि MG Comet EV गाड्या आहेत. या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी मारुती ही कार 2026-27 च्या आसपास भारतात लाँच करू शकते. जर ही कार भारतात लाँच झाली तर भारतातील सर्वात परवडणाऱ्या EV पैकी एक बनू शकते.


