सातारा : फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी माहिती समोर आली आहे. ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली त्या हॉटेलमधला सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.तेव्हापासून हॉटेल मधुदीप प्रचंड चर्चेत आले होते. डॉक्टर तरुणीला या हॉटेलमध्ये बोलावून तिची हत्या करण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी मधुदीप हॉटेलचे मालक दिलीप भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. या प्रकरणात आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, असेही ते म्हणाले.
advertisement
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये एन्ट्री करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. दरम्यान तीच्या सोबत दुसरं कुणी होतं की ती एकटीच होती हे अद्याप अस्पष्ट आहे. हॉटेलचे मालक दिलीप भोसले म्हणाले, सुरुवातीला पोलिसांना ज्यावेळेस पोलिसांना बोलावले त्यावेळी पोलिसांनी यायला उशीर होत असल्यामुळे आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन रुम उघडली. त्यानंतर पोलिसांना पाचरण केले असता पोलीस लगेच आले. ही हत्या नाही तर आत्महत्या आहे. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हॉटेल मालकाने काय काय सांगितलं?
मी गेले 30-35 वर्ष झालं सामाजिक कार्यात काम करतोय आणि चांगले निर्णय घेतले त्याच्यामुळे काही लोक मला बदनाम करतात . आम्ही 23 ला मध्यरात्री दीड वाजता तिला रूम दिली.रात्री येताना सांगितलं की मला सकाळी साडेनऊ वाजता बारामतीला जायचं आहे . परंतु जेव्हा पाच वाजता संशय आला त्यावेळेस आम्ही वकिलांच्या सल्ल्यानुसार दरबारजा उघडला त्यावेळेस तिने फास घेतलेला पाहायला मिळालं. त्यानंतर तात्काळ आम्ही पोलिसांना पाचारण केलं आणि पोलिसांना आम्ही सगळे सहकार्य केलं आहे, अशीही माहिती दिलीप भोसले यांनी दिली.
हॉटेल मालकाला संशय कधी आलं?
दिलीप भोसले पुढे म्हणाले. हॉटेल चालक म्हणून एखादा व्यक्ती इतका वेळ खोलीत राहतो तर तुमची जबाबदारी नव्हती का यावर हॉटेल मालक म्हणाले, हो आमची जबाबदारी होती मात्र आम्हाला असं वाटलं की रात्री उशिरा आल्यामुळे त्यांनी काही मागितले नसेल आणि नेमकी साडेबारा वाजता शिफ्ट चेंज झाली जेव्हा आम्हाला संशय आला.
डॉक्टर हॉटेलमध्ये आल्या तेव्हा पॅनिक दिसत होत्या
ज्यावेळेस ती हॉटेलमध्ये आली त्यावेळेस सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला रूम दिली. तेव्हा नंतर कुणीच रूम मधून बाहेर आलं नाही. ज्यावेळी डॉक्टर आल्या त्यावेळेस त्या पॅनिक वाटत होत्या. त्यांना गाडी देखील आत घेता आली नाही आमच्या वॉचमनने गाडी आत मध्ये घेतली. गेली 30-35 वर्षे झालं मी काम करतो आहे त्याच्यामुळे विरोधक जाणून-बुजून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे ही हत्या नसून ही आत्महत्या आहे, असे दिलीप भोसले म्हणाले.
