डॉ. संपदा मुंडे यांच्यावर पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्याने दबाव येत होते. त्याचा आणखी एक पुरावा सुषमा अंधारे यांनी समोर आणला आहे. रत्नशिव संभाजी निंबाळकर या युवकाचा 12 मार्च 2025 ला निर्घृण खून झाला. मात्र अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलीस स्टेशनचा प्रयत्न होता. डॉ. संपदा मुंडे ने असे करण्यास स्पष्ट नकार दिला होता.
advertisement
काय म्हणाली पत्नी?
सात महिने झाले तरी अद्याप आम्हाला न्याय मिळाला नाही. न्यायसाठी आम्ही खूप फिरलो पण आमची दखल कोणी घेतली नाही. पोस्टमार्टममध्ये आम्हाला अपघात सांगितलं, अशी माहिती मृत रत्नशिव निंबाळकर यांच्या पत्नीने दिली. तर रत्नशिव निंबाळकर यांची बहीण शीतल शिंदे यांनी देखील भावाला न्याय द्यावा अशी मागणी केली. दत्तात्रय ऊर्फ काका यानं अपघाताचा बहाणा घडवून आणत भावाच्या डोक्यात कोयत्यानं वार केल्याचं म्हटलं. आठ दिवसानंतर एफआयर दाखल केल्याचं त्यांनी म्हटलं.राजकारणातून दबाव येतोय असं आमच्या लक्षात येतेय, असं शीतल शिंदे म्हणाल्या.
आरोपी कोण आहे?
रत्नशिव निंबाळकर पत्नी, मुलांसह ,आई वडील अन् विधवा बहीण आणि तिच्या मुलांचा सांभाळ करत होता.फक्त गावात नाव बदनाम केल्याच्या रागातून दत्तात्रय निंबाळकर यानं रत्नशिव निंबाळकराला गाडीनं ठोकून आणि त्यानंतर कोयत्यानं वार करुन संपवलं. रत्नशिव निंबाळकर बहिणीच्या मुलाला परीक्षेसाठी सोडायला निघाले होते. आजपर्यंत न्याय मिळालेला नाही . मुख्य आरोपी दत्तात्रय निंबाळकर याचा भाऊ सुरेश निंबाळकर भाजपचा फलटणचा सरचिटणीस आहे.
हे ही वाचा :
