या कॅफेमध्ये हेल्दी पण स्वादिष्ट पदार्थांची समृद्ध मेजवानी आहे. मॉकटेल्स, फ्रेश जुसेस आणि सँडविचेस विविध प्रकार येथे मिळतात. विशेष म्हणजे येथील पदार्थ अगदी 20 रुपयांपासून सुरू होतात, त्यामुळे आरोग्यदायी अन्न आता प्रत्येकासाठी परवडणारे झाले आहे.
कॅफेच्या मालक सुवर्णा सांगतात, आजची तरुण पिढी वाचनाकडे कमी लक्ष देते, म्हणून आम्ही आमच्या कॅफेमध्ये एक छोटंसं लायब्ररी सेक्शन तयार केलं आहे जेणेकरून लोक पुन्हा पुस्तकांच्या सहवासात वेळ घालवतील. या लायब्ररीमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत ज्यामुळे ग्राहकांना गरम कॉफी किंवा फ्रेश जुसेससोबत वाचनाचा आनंद घेता येतो. फक्त प्रौढांसाठीच नव्हे तर लहान मुलांसाठी काही खेळणी देखील येथे ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे हे ठिकाण कुटुंबांसाठी आदर्श ठरत आहे.
advertisement
Success Story : शेफचे काम सोडले, उभारला अनोखा कॅफे, तरुणाची महिन्याला इतकी कमाई
सुवर्णा यांनी आरोग्याबरोबरच पर्यावरणाचा विचार करून त्यांच्या मेनूमध्ये वेगन पदार्थांचाही समावेश केला आहे. येथे मिळणाऱ्या सँडविचेसमध्ये ताज्या भाज्यांचा वापर करण्यात आला आहे. सँडविचेसमध्ये वापरला जाणारा ब्रेड ब्राउन ब्रेड असून तो तेलकट किंवा जड नसतो. जुसेस पूर्णपणे फ्रेश आणि काही शुगर फ्री असल्याने आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठी हा कॅफे योग्य पर्याय ठरतो.
सुवर्णा सांगतात, लोकांनी हेल्दी आणि सजग जीवनशैली स्वीकारावी म्हणून आम्ही ही सुरुवात आमच्या कॅफेपासून केली. आरामदायी वातावरण, ताजे आणि पौष्टिक पदार्थ, पुस्तकांची संगत आणि शांततेचा स्पर्श या सर्वांचा सुंदर संगम म्हणजे सुवर्णा एलिक्सर टेल्स. विलेपार्लेकरांसाठी हे ठिकाण केवळ एक कॅफे नसून आरोग्य, चव आणि मन:शांतीचं आगळंवेगळं ठिकाण ठरत आहे.





