अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरांचा हा संताप व्यक्त केला आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणींच्या मृत्यूचं महाराष्ट्रात खळबळ उडालीय.. ही आत्महत्या की हत्या? याविषयी संशयाचं वातावरण आहे. त्यातच आता रामराजे याप्रकरणाची अप्रत्यक्षपणे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळतंय. या घटनेनं फलटणची जगभरात बदनामी झाल्याचा घणाघात करत नाईक निंबाळकर ब्रँडचं वाटोळं केल्याची हल्ला रामराजे नाईक निंबाळकरांनी रणजितसिहं निंबाळकरांवर चढवला.
advertisement
फलटणच्या इतिहासात कलंक : रामराजे निंबाळकर
डॉक्टर मुलीच्या मृत्यूनं फलटणच्या इतिहासात कलंक लागल्याचं विधानं रामराजेंनी केलं, फलटण तालुक्याची संस्कृती बिघडवू नका चुकीचं भविष्यात माणसांना दाखवू नका असं म्हणत रामराजेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली. एवढंच नाही तर, मृत डॉक्टरचा पुतळा बसवण्याची घोषणाही रामराजेंनी केली आहे.
डॉक्टर तरुणीचा मृत्यू कसा झाला?
रामराजेंनी थेटपणे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याचं दिसतंय.. पण, यासंदर्भात रणजितसिंह निंबाळकरांकडून अद्याप तरी प्रतिक्रिया आलेली नाही. पण, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मात्र फलटण मृत्यूप्रकरणी महिला आयपीएस अधिकार्यांच्या नेतृत्त्वात एसआयटी गठीत करण्याचे निर्देश दिले आहे. दुसरीकडे राज्यभरातील डॉक्टरही याप्रकरणात आक्रमक झाल्याचं दिसतंय.. त्यामुळं यातील राजकारण बाजुला ठेवून, खरंच डॉक्टर तरुणीचा मृत्यू कसा झाला? याची सत्यता समोर येण्याची गरज व्यक्त होत आहे.
