सातारा : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याबाबतचा भारतीय हवामान खाते आणि कृषी हवामान विभाग त्याचबरोबर राज्यातील कृषी सल्ला, कृषी हवामान केंद्र यांच्याकडून एक अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाची स्थिती त्याचबरोबर हवामान इशाऱ्याचा शेतीवर होणारा संभाव्य परिणाम कसा असेल, याचबाबत आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
31 ऑगस्ट रोजी विदर्भात तुरळ ठिकाणी जोरदार ते अति जोरदार 12 सेमी पावसाची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी जोरदार 7 सेमी पावसाची शक्यता आहे. तर यामुळे शेतीवर होणारे संभाव्य परिणामांचा विचार केला असता कोकणातील, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यात तुरळ ठिकाणी जोरदार त्याआधी जोरदार पावसामुळे आधीच पिकांना खत दिल्यास भात पिकातील खताचे पाणी वाटे जमिनीच्या खालच्या थरात झिरपून नुकसान होऊ शकते.
तसेच टोमॅटो, वांगी, मिरची इत्यादी भाजीपाला पिकात फुल आणि फळ धारणा कमी होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसामुळे भात पिकात पावसाचे पाणी साचू शकते. यामुळे रोपांची वाढ खुंटते. तसेच नाचणी, सोयाबीन आणि भुईमूग पिकाची मूळे, तर हळद पिकात कंद कुजू शकतात.
त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाट भागात तुरळ ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन, केळी आणि नवीन लागवड केलेल्या आंबा पिकात पावसाचे पाणी साचले तर झाडांची वाढ खुटते किंवा नुकसान होऊ शकते, असा हवामान इशाराचा शेतीवर होणारा संभाव्य परिणाम आहे.
शेतकऱ्यांना सल्ला -
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यात त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील तुरळ ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दहन पूर्ण लागवड केलेल्या शेतात पाण्याची पातळी 5 ते 10 सेमीपर्यंत नियंत्रण करुन ठेवावी. तर सोयाबीन, कापूस, तूर, भात, मूग, उडीद, मका, सूर्यफूल तसेच भाजीपाला व फळबागातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
थंड की गरम, सकाळी उपाशी पोटी नेमकं कोणतं पाणी प्यावं, योग्य पद्धत तब्बल 56 आजारांना ठेवते दूर
त्याचबरोबर नवीन लागवड केलेल्या भाजीपाला व फळबागांमध्ये काठीचा आधार द्यावा, तसेच मेघगर्जना विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी जनावरांना गोठ्यात बांधावे, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
