सातारा : महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीचा पुत्र म्हणून ओळखला जाणारा गणपती सर्वांनाच हवाहवासा वाटतो. गणपती शांत देवता मानला जातो. कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते. महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर गणरायाची प्रतिष्ठापना करून घरामध्ये गणपती बसवला जातो. मात्र, साताऱ्यातील मल्हारपेठ येथे एक वेगळीच पिढ्यान पिढ्या परंपरा चालत आली आहे. याठिकाणी शंकर, पार्वती आणि त्यांचा पुत्र गणपती या तिघांच्या एकत्रित मूर्ती घरामध्ये बसवण्याची आहे. नेमकी काय आहे ही परंपरा, याचबाबत आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
साताऱ्यातील मल्हारपेठ येथे शंकर, पार्वती आणि गणपती या तिघांची प्रतिकृती असलेली मूर्ती घरामध्ये बसवण्यात येते. येथील हिंदुराव तपासे यांनी याबाबत सविस्तर अशी माहिती दिली.
का बसवली जाते महादेवाची मूर्ती -
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, बुद्धिदाता, गणांचा अधिपती, प्रथमेश यांसारख्या विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. भगवान गणेशाची “विघ्नहर्ता” म्हणून पूजा केली जाते. पण साताऱ्यातील मल्हारपेठ येथे 100 वर्षे पूर्वीपासून त्यांच्या अनेक पिढ्यांनी शंकर गणपती आणि पार्वती या तिघांच्या एकत्रित महादेव मूर्ती घरामध्ये बसवण्यात येतात. ढोर लिंगायत समाजामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तीच परंपरा अखंडरित्या सुरू आहे.
ढोर समाजाचे गुरू बसवेश्वर लिंगायत यांचे शिष्य कक्कया महाराजांच्या काळापासून संपूर्ण लिंगायत समाज ही महादेवाची मूर्ती बसवतात. संपूर्ण ठिकाणी फक्त गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. मात्र, या समाजात महादेव मूर्तीची स्थापना केली जाते. महादेवाची मूर्ती ही शंकर पार्वती आणि गणराया या तिघांना एकत्र करून तयार केली जाते.
11 दिवस या तिघांची नित्यनेमाने पूजा अर्चना केली जाते. या उत्सवाची सांगता गणेश मूर्तीच्या विसर्जनाने होते. पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरेला अखंडरित्या अशीच सुरू ठेवणार असल्याचे देखील हिंदुराव तपासे यांनी सांगितले.
बाप्पाच्या मूर्तीसह वर्ल्डकपचा अनोखा देखावा, ट्रॉपी बनवली अगदी ओरिजीनल सारखी, पुण्यातील VIDEO
सध्या महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. गल्ली, गाव, शहर आणि घरांमध्ये गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. मात्र, साताऱ्यातील मल्हारपेठ ढोर गल्ली येथे ही आगळीवेगळी शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा अखंडरित्या चालत आली आहे.