TRENDING:

Satara : मैत्रिणीने काढलं मुलाच्या नावाने अकाउंट; दुसरी पडली प्रेमात; इन्स्टाग्रामवर मस्करीत गेला जीव

Last Updated:

एकीने मस्करी करण्यासाठी मनीष नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट उघडलं. दुसरी मैत्रिण फेक अकाउंटवरील मनिषच्या प्रेमात पडली आणि हे प्रकरण शेवटी तिच्या आत्महत्येपर्यंत पोहोचलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा : इन्स्टाग्रामवर मैत्रिणीने मुलाच्या नावाने फेक अकाउंट उघडून दुसऱ्या मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. जेव्हा भेटायची वेळ आली तेव्हा तरुणाने आत्महत्या केल्याचं सांगिताच तरुणीला धक्का बसला. त्यातून तरुणीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातल्या वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी फेक अकाउंट उघडून मस्करी केलेल्या तरुणीला पोलिसांनी अटक केलीय.
News18
News18
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावातली तरुणी आणि दुसरी एक तरुणी दोघी मैत्रिणी होत्या. यात एकीने मस्करी करण्यासाठी मनीष नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट उघडलं. त्यावरून आपल्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर फेक अकाउंटवर दोघीही बोलत होत्या. दरम्यान, दुसरी मैत्रिण फेक अकाउंटवरील मनीषला खरं समजून त्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर भेटण्यासाठी तगादा लावताच फेक अकाउंटवरून बोलणाऱ्या तरुणीने आणखी एक उद्योग केला. त्यानंतर प्रेमात पडलेल्या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं.

advertisement

मनीषच्या प्रेमात पडलेल्या तरुणीला समजावण्यासाठी मैत्रिणीने आणखी एक शिवम पाटील नावाने अकाउंट काढलं आणि त्यावरून आपण मनीषचे वडील असल्याचं सांगत त्याचा मृत्यू झालाय असं प्रेमात पडलेल्या तरुणीला सांगितलं. इतकंच नाही तर दवाखान्यातले खोटे फोटोही पाठवले. हा धक्का प्रेमात पडलेल्या २४ वर्षीय तरुणीला सहन झाला नाही आणि तिने १२ जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

तरुणीच्या आत्महत्येनंतर या प्रकऱणी वाठार स्टेशन पोलिसात अकस्मात निधनाची नों द झाली. मात्र सायबर पोलीस या प्रकरणी तपास करत होते. त्यानंतर इन्स्टाग्राम अकाउंटबाबत डिटेल्स समोर येताच सर्व प्रकार उघड झाला. आता या प्रकरणी संशयित तरुणीला अटक केलीय.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara : मैत्रिणीने काढलं मुलाच्या नावाने अकाउंट; दुसरी पडली प्रेमात; इन्स्टाग्रामवर मस्करीत गेला जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल