ओळखीचा फायदा घेऊन वारंवार अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, कराड परिसरातील एका गावातील पीडित महिला आणि संशयित यांच्यात ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत, संशयिताने पीडितेशी जवळीक वाढवली. त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, "तुझे इतरांशी बोलतानाचे फोटो माझ्याकडे आहेत; ते मी तुझ्या घरी दाखवून तुझी बदनामी करेन," अशी धमकी देत त्याने 10 मे 2023 पासून तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले.
advertisement
...तरीही पीडितेला त्रास देणे सुरूच
सुरुवातीला, बदनामीच्या भीतीने पीडितेने कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, संशयिताचा त्रास वाढतच गेल्याने अखेर तिने आपल्या भावाला सर्व घडले ते सांगितले. भावाने संशयिताला बोलावून घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. पण, यानंतरही संशयिताने पीडितेला त्रास देणे थांबवले नाही.
...आणि पीडितेचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केला
दरम्यानच्या काळात, संशयिताने पीडितेच्या नावाचा वापर करून एका अश्लील वेबसाइटवर खाते उघडले. हा प्रकार समोर आल्यावरही त्याला ताकीद देण्यात आली होती. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी पीडिता आपल्या कुटुंबासह दुसऱ्या गावी राहायला गेली. पण, तरीही संशयिताकडून तिला त्रास देणे सुरूच होते. नुकतेच, त्याने पीडितेचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला, ज्यामुळे तिच्या आयुष्यात आणखी मोठा धक्का बसला.
संशयित तरुणावर गुन्हा दाखल
जेव्हा पीडितेच्या कुटुंबीयांनी हा व्हिडिओ पाहिला, तेव्हा त्यांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी, तिने कुटुंबाला आपल्यावर झालेल्या सर्व अत्याचारांची माहिती दिली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून, कराड ग्रामीण पोलिसांनी तात्काळ संशयितावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
हे ही वाचा : Navi Mumbai : शिक्षिकेचे अश्लिल चॅट्स, विद्यार्थ्याला पाठवले प्रायव्हेट Video, मुंबईनंतर आता नवी मुंबई हादरली
हे ही वाचा : Malegaon: भर दिवसा तरुणावर गोळ्या झाडल्या अन् हत्याराने केले सपासप वार, मालेगाव हादरलं!