Malegaon: भर दिवसा तरुणावर गोळ्या झाडल्या अन् हत्याराने केले सपासप वार, मालेगाव हादरलं!
- Published by:Sachin S
- Reported by:BABBU SHAIKH
Last Updated:
मालेगाव शहरात गुन्हेगाराची आलेख वाढत चालला असून मंगळवारी सायंकाळी शहरातील पवारवाडी पोलीस हद्दीत असलेल्या भागात अज्ञात गुंडानी
मालेगाव: नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. कायद्याचा धाक आहे की नाही, असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. अशातच मालेगावमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. शहरातील पवारवाडी पोलीस हद्दीत असलेल्या भागात अज्ञात गुंडानी एका तरुणावर गोळीबार केला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरात गुन्हेगाराची आलेख वाढत चालला असून मंगळवारी सायंकाळी शहरातील पवारवाडी पोलीस हद्दीत असलेल्या भागात अज्ञात गुंडानी घराकडे जाणाऱ्या एका तरुणावर गोळीबार केला. अनिश शेख असं या तरुणाचं नाव आहे. अनिश शेख याच्या पोटात गोळी लागली आहे. गोळी लागल्यानंतर खाली पडलेल्या या तरुणावर गुंडानी धारधार हत्याराने ही वार केले. त्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला. गोळीबार झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे अनिस शेख गंभीर जखमी झाला. त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आहे. या तरुणावर उपचार सुरू आहे.
advertisement
मात्र, दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या तरुणावर हल्ला का? आणि कोणी केला हे स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.
Location :
Malegaon,Nashik,Maharashtra
First Published :
July 29, 2025 7:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Malegaon: भर दिवसा तरुणावर गोळ्या झाडल्या अन् हत्याराने केले सपासप वार, मालेगाव हादरलं!