साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीने तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यानंतर पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली आहे. मात्र, आज साताऱ्यातील पोवई नाक्यावर मुलीच्या नातेवाईकासह काही लोक एकत्र आल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस आणि नातेवाईक यांच्यामध्ये झटापट देखील झाली. मात्र, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात घेऊन सर्व बाजू समजावून घेतली.
advertisement
वाचा - कोमल निघाली बेवफा! 5 वरांशी केले लग्न, हनिमूनही साजरा केला पण.. राज्यात खळबळ
काही दिवसापासून संशयित आरोपी हा मुलीला वारंवार त्रास देत होता. त्या त्रासाला कंटाळून या मुलीने आणि तिच्या नातेवाईकांनी या तरुणाचा विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने त्या तरुणावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आले होती. मात्र, काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता झालेल्या या तरुणाने पुन्हा या मुलीला आणि तिच्या घरातल्या लोकांना धमकी दिल्याने या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
