अजित पवार यांच्या पक्षाचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाला स्वत: शरद पवार, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे आदी नेते उपस्थित आहेत.
पैसे नसताना तिजोरीची होळी करून सत्तेची दिवाळी करणं सुरू, सरकारला घरी बसवा, कोल्हे आक्रमक
advertisement
आमची कोणतीही कामे महायुतीतील घटक पक्षांच्या मंत्र्यांनी केली नाहीत, मग महायुतीत राहून फायदा काय?
अजित पवार यांची साथ सोडल्याबाबत भूमिका मांडताना दीपक चव्हाण म्हणाले, खरे तर आम्हाला महायुतीत करमतच नव्हते. पण नेत्याने (अजित पवार) निर्णय घेतला होता. म्हणून आम्हाला जावे लागले. शेवटी जनतेच्या प्रश्नांना महत्व असते. परंतु आमची कोणतीही कामे महायुतीतील घटक पक्षांच्या मंत्र्यांनी केली नाहीत. आम्हाला सन्मान मिळाला नाही. नाईलाजाने आम्ही महायुतीत राहिलो.
आता फलटणमध्ये तुतारी वाजवायचीच, शरद पवारांचे हात बळकट करायचे, आमदार दीपक चव्हाण यांचा निर्धार
आम्हाला तिकडे अजिबात करमत नव्हते. सगळ्या चुकीच्या गोष्ठी महायुतीत घडत होत्या. परंतु हे अजितदादांच्या अजून का लक्षात येत नाही, याची मला कल्पना नाही. झाले गेले जाऊ द्या. आता पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी तुतारी हाती घेतली आहे. पक्षस्थापनेपासून मी पक्षाचे काम करतो आहे. पक्षाने मला संधी दिली. आता शरद पवारांचे हात बळकट करायचे आहेत. आता फलटणमध्ये तुतारी वाजवायचीच, असा निर्धार दीपक चव्हाण यांनी बोलून दाखवला.
