पैसे नसताना तिजोरीची होळी करून सत्तेची दिवाळी करणं सुरू, सरकारला घरी बसवा, कोल्हे आक्रमक

Last Updated:

अजित पवार यांच्या पक्षाचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अमोल कोल्हे (खासदार)
अमोल कोल्हे (खासदार)
मुंबई : महाराष्ट्र सरकारने आपला स्वाभिमान दिल्लीश्वरांच्या पायाखाली गहाण ठेवला आहे. त्यामुळे दिल्लीसमोर गुडघे टेकणं बस्स झालं. तुम्ही ताठ मानेने निर्णय घेतला याबद्दल तुमचे आभार मानतो. आता फलटणमध्ये तुतारी वाजणारच... असा विश्वास खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांच्या पक्षाचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाला स्वत: शरद पवार, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे आदी नेते उपस्थित आहेत.
फलटणमध्ये तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही, अमोल कोल्हे यांना विश्वास
अमोल कोल्हे म्हणाले, याआधी फलटणला जेव्हा यायचो तेव्हा इथे तुतारी वाजलीच पाहिजे असे वाटायचे. पण अखेर आज योग आला. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी निर्णय घेतला. दीपक चव्हाण आज पक्षात प्रवेश करत आहेत. आता फलटणमध्ये तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही, असे कोल्हे म्हणाले.
advertisement
दिल्लीसमोर गुडघे टेकणं बस्स झालं, आता निर्णय घेण्याची वेळ, जनतेने ठरवलं
आतापर्यंत तेल, बिस्किट, साखर विकत घेता यायची. परंतु आमदार खरेदी करता येतात, हे भाजपने दाखवून दिले. आमदारांना ईडी सीबीआय सारख्या संस्थाचा धाक दाखवून यांनी आपल्या लोकांना पक्षात घेतले. पण महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने दिल्लीसमोर गुडघे टेकणं बस्स झालं असे म्हणत ताठ मानेने निर्णय घेण्याचे ठरवले आहे. इकडे हरियाणासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. राज्यात आपली महाविकास आघाडीच जिंकेल, असे कोल्हे म्हणाले.
advertisement
मतांची झाली कडकी म्हणून लोकसभेनंतर झाली बहीण लाडकी, कोल्हे बरसले
मतांची झाली कडकी म्हणून लोकसभेनंतर झाली बहीण लाडकी... तिजोरीत खडखडाट असताना सरकारने तिजोरीची होळी करून सत्तेची दिवाळी करण्याचे ठरवेल आहे. त्यामुळे या सरकारला घरी बसविण्याची वेळ आली आहे, असे कोल्हे म्हणाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
पैसे नसताना तिजोरीची होळी करून सत्तेची दिवाळी करणं सुरू, सरकारला घरी बसवा, कोल्हे आक्रमक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement