चुकलं असेल तर माफी मागते
खासदार साहेब मी आई-वडिलांचं काय चुकलं असेल तर माफी मागते, हे सगळं थांबवा अशी विनंती आणि विनवण्या करत आहे. तर सुसाईड नोटमध्ये देखील रणजीत निंबाळकरांसह अन्य काही लोकांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा दिगांबर आगवणे या मुलीने आणि तिच्या बहिणीने वडील दिगांबर आगवणे तीन वर्षांपासून जेलमध्ये असल्याने आणि आई देखील अनेक महिन्यांपासून घरी नसल्याने आणि मुलींना त्रास होत असल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
advertisement
डॉक्टरची हत्या आहे की आत्महत्या?
फलटण प्रकरणात पोलिसांनी कोणत्या अधिकाराने निंबाळकरांना फोन केला? असा सवाल मेहबूब शेख यांनी विचारला आहे. फलटण ग्रामीण हे वसुली केंद्र आहे. क्लिन चीट द्यायची ऐवढी घाई का? डॉक्टरची हत्या आहे की आत्महत्या? याची चौकशी झाली पाहिजे. असंही मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे. कागदपत्र दाखवत मेहबूब शेख यांनी मोठे खुलासे केले आहेत. मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केलेल्या आगवणे कुटुंबातील मुलीचा व्हिडिओ आणि सुसाईड नोट समोर आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासा
मधुदिप हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि धुमाळ यांच्या पाठीमागे नेमके कोणाचा हात आहे, याचा तपास व्हायला हवा. अनेक लोकांवर अन्याय करण्यात आला आहे आणि हळूहळू ते सर्व लोक आता समोर येतील. त्यांनी 'हगवणे' कुटुंबाचे उदाहरण दिले, जे विधानसभा लढले होते. त्या कुटुंबाचे पाणी आणि लाईट कनेक्शन तोडण्यात आले, ज्यामुळे कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच नातेवाईकांना अजूनही पीएम रिपोर्टच्यानोट्स देण्यात आलेल्या नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली. शेवटी त्यांनी थेट इशारा दिला की, "तुम्ही बीडपेक्षा फलटण पॅटर्न आता महाराष्ट्राला दाखवत आहात.
अंबादास दानवे यांचे धक्कादायक आरोप
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर आरोप केला होता. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, त्यांचा भाऊ अभिजीत निंबाळकर आणि फलटणचे आमदार सचिन कांबळे हे अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात आणि चुकीचे कामं करून घेतात, असा आरोप केला आहे. दानवे यांच्या आरोपानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याचं पहायला मिळालं होतं.
