नेमकं काय घडलं?
साताऱ्यातील पाटखळ गावात धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणात जुन्या वादातून संशयित शिवजीत माने या युवकाने त्याच्या इतर साथीदारांना घेऊन अनिल शिंदे या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये संबंधित व्यक्ती पस्तीस टक्केहुन अधिक भाजून जखमी झाली आहे. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ जखमी व्यक्तीच्या अंगावरील आग विझवून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणात सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणातील संशयित शिवजीत माने यांच्यासह 3 जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
advertisement
Location :
Satara,Maharashtra
First Published :
June 12, 2024 2:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara News : सातारा हादरलं! पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
