पहिल्या फेरीपासून आघाडी घेतल्यानं विश्वास आहे. 81 हजारांचं लीड मिळाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरू आहे. पहिल्या दिवसापासून ही निवडणूक मविआच्या माध्यमातून जिंकेल असा विश्वास होता. मनापासून आभार मानतो, साताऱ्यातील मतदारांचे, सामान्य कार्यकर्त्याला निवडून दिलं त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी दिली.
advertisement
घड्याळ चिन्ह गायब
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून साताऱ्याची जागा लढवेल असा अंदाज होता. पण, त्यांना प्रबळ उमेदवार मिळाला नाही. उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रयत्न झाला. पण, त्याला उदयनराजेंनी नकार दिला. त्यानंतर भाजपाकडून राजेंना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच घड्याळ चिन्हशिवाय सातारा लोकसभा निवडणूक लढली गेली.
पक्षीय बलाबल
सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये सातारामध्ये भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले आमदार आहेत. पाटणमध्ये शिवसेनेचे शंभुराज देसाई, कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील, वाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील तर कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे आमदार आहेत. सहापैकी चार जागा या महायुतीकडं असून दोन जागांवर महाविकास आघाडीचे आमदार होते.
वाचा - बारामतीनंतर शिरुरमध्ये अजितदादांना धक्का! कुठे फिरली निवडणूक?
मागील निवडणुकांचे निकाल
उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2009, 2014 आणि 2019 साली झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीत उदयनराजे 1 लाख 26 हजार मतांनी विजयी झाले. त्यानंतर त्यांनी काही महिन्यातच भाजपामध्ये प्रवेश केला. ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील 87 हजार मतांनी विजयी झाले होते.
