शरद पवारांची साताऱ्यात मोठी खेळी
शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवणं ही शरद पवारांची ही वेगळी चाल असल्याचं बोललं जातंय. पवारांनी अनेक गणितं आखुन शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे. शशिकांत शिंदे यांचा कार्यकर्ता प्रत्येक तालुक्यात आहे, ही त्यांच्या जमेची बाजु आहे. शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असताना प्रत्येक तालुक्यात जावुन राष्ट्रवादी मजबुत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळं प्रत्येक तालुक्यात शशिकांत शिंदे यांना ओळखणारी लोकं आहेत. तसंच शशिकांत शिंदे हा संयमी चेहरा असुन शरद पवारांच्या अत्यंत विश्वासातील सुद्धा आहेत. या बाजू खुप जमेच्या असुन उदयनराजे भोसले यांच्यासोबत लढण्यासाठी महत्वाचं असल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
यावर शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असुन आपण शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलो. त्याचे फळ मिळाले असून मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्याकडून शुभेच्छा मागणार असून त्यांनी मित्राला शुभेच्छा द्याव्यात अशी भावना व्यक्त केली. उमेदवारी जाहीर होण्याआधी आपल्याला दोन नोटिसा आल्या आहेत. सातारा लोकसभा मतदार नेहमीच राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर प्रेम करत आला असून यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. चिन्ह वेगळे असले तरी तुतारी फुंकली असून, निवडणूक आयोगाकडे, उगवता सूर्य, पिंपळाचे झाड, सिटी असे अनेक चिन्ह मागितले. मात्र, तुतारी मिळाली, तीच विजयाची तुतारी फुंकली जाईल. मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला.
वाचा - 'सांगली' ठाकरेंकडे गेल्यानंतर विश्वजीत कदमांनी मौन सोडलं; वस्तूस्थिती सांगितली
खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाचे राज्यसभा खासदार आहेत. मात्र, जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे नेते म्हणुन त्यांच्याकडं पाहिलं जातं. उदयनराजे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पुन्हा मैदानात आहेत. यावेळी उदयनराजेंचा जोश दुप्पट आहे. 2019 चा पराभव सोडला तर उदयनराजे यांना निवडणुकीत नामोहरण करणं अत्यंत अवघड आहे. उदयनराजे यांची फॅन आर्मी खुप जोरदार असुन झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कार्यकर्त्यांनीच आता निवडणूक हातात घेतली आहे. मान सुद्धा गादीला आणि मत सुद्धा गादीला हे घोषवाक्य आता सर्वत्र पाहायला मिळतंय. कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण या मतदारसंघात उदयनराजे थोडे कमकुवत वाटत होते. मात्र, आता हेच मतदारसंघ पिंजुन मागच्या झालेल्या चुका सुधारल्या आहेत, असं सांगुन कराडकरांना आपलंस केलंय. यामुळं कराडकरांच्या मनात घर करायला उदयनराजेंनी सुरुवात केली. शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देत प्रत्येकाने आपल्या परीने तयारी करावी. जनता निर्णय घेईल, असं म्हणुन चेंडु जनतेच्या कोर्टात ढकलला आहे. तर भाजपा हा मोठा पक्ष आहे. सर्वांसोबत बोलुनच निर्णय होतो. यामुळं विलंब लागत असल्याचं उदयनराजे म्हणाले आहेत.
सातारा लोकसभेच्या मैदानात नक्की कोणाचं पारडं जड हे सांगणं कठीण असलं तरी दोन्ही उमेदवार तेवढेच तुल्यबळ असल्याचं पाहायला मिळत आहे. उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे ही निवडणुक अत्यंत चुरशिची आणि उत्सुकतेची ठरणार आहे हे मात्र नक्की.
