Sangli Loksabha : 'सांगली' ठाकरेंकडे गेल्यानंतर विश्वजीत कदमांनी मौन सोडलं; वस्तूस्थिती सांगितली
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. यातली सांगलीची जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे गेल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे.
आसिफ मुरसल, प्रतिनिधी
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. महाराष्ट्रातल्या 48 पैकी 21 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना, 17 जागा काँग्रेस आणि 10 जागा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. यातली सांगलीची जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे गेल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. यानंतर आज काँग्रेस आमदार विश्वजीत कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस नेत्यांची सांगलीमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर विश्वजीत कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला.
advertisement
काय म्हणाले विश्वजीत कदम?
'जातीयवादी भाजप सरकारने चुकीच्या गोष्टी केल्या, महागाई, गुन्हेगारी वाढली, महिलांवर अत्याचार झाले. बेरोजगारीमुळे तरुणाई त्रासलेली आहे, यामुळे इंडिया आघाडीने एकत्र निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय घेतला. तीन महिन्यांपासून जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या. तेव्हापासून काँग्रेस पक्ष आणि सांगलीचे कार्यकर्ते सांगलीचा इतिहास पाहता, सांगली स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही जिल्ह्यातले सगळे राज्यातल्या आणि दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते', असं विश्वजीत कदम म्हणाले.
advertisement
'मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल, रमेश चेनिथला यांना सातत्याने भेटलो. सांगलीची जागा काँग्रेसची असावी, काँग्रेसला लढायला मिळावी ही भावना मांडली. काँग्रेस ही जागा लढण्यासाठी सक्षम आहे. कोल्हापूरची जागा शाहू महाराजांना काँग्रेसच्या चिन्हावर लढायची म्हणून काँग्रेसला देण्यात आली, म्हणून उद्धव ठाकरेंनी सांगलीचा दावा केला आणि अचानक चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर थोरात, पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी एकतर्फी निर्णय असल्याचं सांगितलं', असं वक्तव्य विश्वजीत कदम यांनी केलं.
advertisement
वस्तूस्थितीची माहिती घ्या
'उद्धव ठाकरेंबाबत व्यक्तीश: आणि काँग्रेसला आदर आहे, पण सांगलीचा राजकीय इतिहास आहे, तो समजून घेऊन महाविकासआघाडीने निर्णय घेतला असता तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. काल 48 जागांचं जागावाटप जाहीर करण्यात आलं. आजही माझी विनंती राहिल की सांगलीची वस्तूस्थिती काय आहे, याची माहिती घ्यावी. जर काही फेरविचार करता येत असेल तर करावा. सांगलीतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची ही भावना आहे. कालची मविआमधील सांगलीची जाहीर झालेली उमेदवारी आम्हला पचनी पडली नाही', असं म्हणत विश्वजीत कदम यांनी पुन्हा एकदा त्यांची नाराजी बोलून दाखवली.
advertisement
'या लढाईत आम्ही महाविकासआघाडीसोबत आहोत. यातून सकारात्मक मार्ग कसा निघेल, यासाठी काँग्रेस कार्यकर्ते म्हणून प्रयत्न करणार आहोत. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबत बैठक घेतली जाईल, त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. वस्तूस्थिती बघून ही काँग्रेसला द्या अशी विनंती आहे', अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
April 10, 2024 5:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangli Loksabha : 'सांगली' ठाकरेंकडे गेल्यानंतर विश्वजीत कदमांनी मौन सोडलं; वस्तूस्थिती सांगितली


