Supermoon 2025: आज रात्री चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ, 'सुपर मून' पाहण्याची खास संधी PHOTOS
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज 'सूपर मून'चं दर्शन होणार असल्याची माहिती पंचागकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली आहे. आजच्या दिवशी आकाशात चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल, तर चंद्रबिंब मोठे आणि अधिक तेजस्वी दिसणार आहे.
advertisement
बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी 'सूपरमून' सायं. 05: 44 वाजता पूर्वेला उगवेल आणि रात्रभर आपणास सुंदर दर्शन देईल. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान आणि कमी तेजस्वी दिसणाऱ्या चंद्राला मायक्रो मून म्हणतात. पण आज आकाशात 'मायक्रो मून' दिसणार नसून 'सूपर मून' दिसणार आहे.
advertisement
'सूपर मून'मध्ये आणि 'मायक्रो मून'मध्ये काही अंशी फरक असतो. 'सूपर मून' हा 'मायक्रो मून'पेक्षा 13 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसतो. तसा तो बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी रात्री दिसणार आहे. सायंकाळी 5 वाजून 44 मिनिटांपासून नागरिकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 'सूपर मून'ची चर्चा होतेय.
advertisement
advertisement
advertisement


