Mumbai Shopping Market : खरेदीची ही संधी नका सोडू! चामड्याच्या वस्तू फक्त 30 रुपयांपासून! मुंबईत हे आहे ठिकाण

Last Updated:

या स्टॉलवर शुद्ध चामड्यापासून तयार केलेल्या विविध वस्तू अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. येथे लहान पॉकेट्स केवळ 30 रुपयांपासून मिळतात.

+
दादरमध्ये

दादरमध्ये शुद्ध चामड्याच्या वस्तू अगदी ३० रुपयांपासून उपलब्ध!

मुंबई : मुंबईतील दादर परिसरातील रानडे रोडवरील असलेल्या एका विशेष स्टॉलने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्टॉलवर शुद्ध चामड्यापासून तयार केलेल्या विविध वस्तू अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. येथे लहान पॉकेट्स केवळ 30 रुपयांपासून मिळतात. याशिवाय स्टॉलवर विविध प्रकारच्या स्लिंग बॅग्स उपलब्ध असून त्यांची किंमत 450 रुपयांपासून सुरू होते. तसेच साइड बॅग्स सुमारे 1800 रुपयांच्या रेंजमध्ये तर जेंट्स वॉलेट्स आणि पर्सेस सुमारे 250 रुपयांमध्ये मिळतात.
फॅशन आणि पारंपरिकतेचा संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्टॉलवर कोल्हापुरी चप्पल देखील उपलब्ध आहे. पुरुषांसाठी 12 नंबरपर्यंत आणि स्त्रियांसाठी 10 नंबरपर्यंत चप्पल मिळतात. या पारंपरिक चप्पलांची किंमत 650 रुपयांपासून सुरू होते. या स्टॉलची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथे विक्रीसाठी ठेवलेल्या सर्व वस्तू स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये तयार केल्या जातात. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आणि टिकाऊ वस्तू अगदी किफायती दरात मिळतात. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार या वस्तू 2 ते 3 वर्षे टिकतात मात्र त्यांचे आयुष्य वापरण्यावरही अवलंबून असते. सरासरी 4 ते 5 वर्ष या वस्तू आरामात टिकतात असा अनुभव ग्राहकांनीही दिला आहे.
advertisement
केवळ किरकोळ ग्राहकांसाठीच नव्हे तर स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. कारण या स्टॉलवर होलसेल आणि रिटेल दोन्ही दरात वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे व्यापारिक दृष्ट्या देखील हा उपक्रम फायदेशीर ठरत आहे. दादरमधील सुविधाची गल्ली, रानडे रोड, सर्वोदय सुपर मार्केटच्या समोरील बाजूस असलेला हा स्टॉल परवडणारे दर, दर्जेदार माल आणि पारंपरिक शैली यांचा उत्तम संगम सादर करतो. त्यामुळे दादर परिसरात चामड्याच्या वस्तू खरेदीसाठी हे ठिकाण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mumbai Shopping Market : खरेदीची ही संधी नका सोडू! चामड्याच्या वस्तू फक्त 30 रुपयांपासून! मुंबईत हे आहे ठिकाण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement