General Knowledge : स्कूटी, बाईक, रिक्षाला टोल का नाही; त्यांना Toll Tax मधून कशी काय सूट मिळते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
कार, बस, ट्रकप्रमाणे स्कूटर, बाईक, रिक्षा टोल का भरत नाही, त्यांच्याकडून टोल का वसूल केला जात नाही, याचा विचार तुम्ही विचार केला आहे का?
तुम्ही प्रवास करताना पाहिलं असेल टोलनाक्यावर पोहोचलात की तुम्हाला कार, बस, ट्रक सगळ्या गाड्या टोल भरण्यासाठी रांगेत उभ्या दिसतील. त्याचवेळी स्कूटर, बाईक, रिक्षा रस्त्याच्या कडेने टोल न भरता जाताना दिसतील. भारतात दुचाकी गाड्यांना टोल करातून पूर्णपणे सूट आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 च्या नियम 4(4) अंतर्गत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना टोल करातून पूर्णपणे सूट आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


