'घोडेबाजारात जाऊन घोडे घेतल्यासारखं...' महेश मांजरेकर घेत नाहीत कलाकारांचं ऑडिशन, स्पष्टच सांगितलं कारण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mahesh Manjrekar : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' साठी सिद्धार्थची निवड करताना महेश मांजरेकरांना अनेकांनी विरोध केला होता, पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. आता एका मुलाखतीत त्यांनी कलाकारांच्या कास्टिंगबद्दल स्पष्ट मत मांडले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मग मांजरेकर कलाकारांची निवड कशी करतात? याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ते नेहमी त्यांच्या इंस्टिंक्टनुसार निर्णय घेतात. सिद्धार्थ बोडकेच्या निवडीबद्दल बोलताना मांजरेकर म्हणाले, "मी त्याचे फार काम पाहिले नव्हते, पण तो नाटकात काम करायचा, हे माहीत होते. मी त्याला पहिल्यांदा भेटलो आणि त्याला बघितल्यावर माझ्या मनात लगेच आले की, हा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारेल." त्यांच्या मते, माणसाची एक पॉवर असते आणि त्यांना सिद्धार्थमध्ये ती पॉवर जाणवली.
advertisement
मांजरेकर म्हणतात, त्यांच्या दृष्टीने अभिनयाच्या कौशल्यापेक्षा आत्मविश्वास अधिक महत्त्वाचा आहे. मांजरेकरांनी सांगितले की, जर एखाद्या कलाकाराला त्यांनी भूमिकेची ऑफर दिली आणि त्या कलाकाराने त्यांना लगेच विचारले की, "तुम्हाला वाटतं का की, मी ही भूमिका करू शकेन?" तर ते त्याला सांगतात, "तू घरी जा! मला वाटून उपयोग नाही, तुला स्वतःला वाटले पाहिजे की तू ती भूमिका साकारू शकतोस."
advertisement


