Salman Khan in Historical Film : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानचा मोठा रोल, कोणती भूमिका साकारणार?

Last Updated:

Salman Khan Upcoming Film : बॉलिवूडमध्ये आपल्या अॅक्शन-पॅक भूमिकांमुळे ओळखला जाणारा सलमान खान आता चक्क एका ऐतिहासिक पीरियड ड्रामा चित्रपटाचा भाग बनत आहे.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अॅक्शन-पॅक भूमिकांमुळे ओळखला जाणारा सलमान खान आता चक्क एका ऐतिहासिक पीरियड ड्रामा चित्रपटाचा भाग बनत आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट 'राजा शिवाजी' या चित्रपटातून सलमान खान मराठी मातीतील एका शूर योद्ध्याची भूमिका साकारणार आहे.
सलमान खान या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, तर ते महाराजांचे जीवलग संरक्षक म्हणून ओळखले जाणारे जीवा महाला यांची भूमिका साकारणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या क्षणाला जीवा महाला यांनी त्यांचे अतुलनीय शौर्य दाखवले होते. अफजल खानच्या भेटीनंतर, त्याचा विश्वासू साथीदार सय्यद बंडा याने महाराजांवर जीवघेणा हल्ला केला होता. त्यावेळी जीवा महाला यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून महाराजांचे रक्षण केले. यानंतर इतिहासात 'होता जीवा, म्हणून वाचला शिवा' हे वाक्य अजरामर झाले.
advertisement
सलमान खान ७ नोव्हेंबरला या ऐतिहासिक सीनचे शूटिंग करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जीवा महालांच्या भूमिकेसाठी सलमानची निवड म्हणजे या महत्त्वाच्या रोलचा प्रभाव वाढवणारा निर्णय मानला जात आहे.

रितेश आणि संजय दत्तसोबतची केमिस्ट्री

सलमान खानने यापूर्वी रितेश देशमुखच्या 'लय भारी' आणि 'वेड' चित्रपटातील गाण्यात पाहुणा कलाकार म्हणून खास हजेरी लावली होती. पण, आता 'राजा शिवाजी'च्या निमित्ताने ते प्रथमच एका ऐतिहासिक भूमिकेसाठी एकत्र काम करत आहेत.
advertisement
या चित्रपटात सलमान खान जीवा महालाची भूमिका साकारणार आहे, तर संजय दत्त हा अफजल खानच्या क्रूर भूमिकेत दिसणार आहे. या दोन दिग्गजांमधील पडद्यावरची लढाई पाहणे प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव असणार आहे.

सलमानचे आगामी प्रोजेक्ट्स

सलमान खानसाठी आगामी काळ खूप व्यस्त आहे. 'राजा शिवाजी' सोबतच, बहुचर्चित 'बॅटल ऑफ गलवान' ही वॉर-ड्रामा फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच, कबीर खानसोबतच्या 'बजरंगी भाईजान २' या चित्रपटाकडूनही चाहत्यांना खूप अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Salman Khan in Historical Film : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानचा मोठा रोल, कोणती भूमिका साकारणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement