मनोज जरांगे व्यासपीठावरच बसले
मनोज जरांगे पाटील यांना भाषणानंतर त्रास जाणवू लागला. त्यामुळे ते व्यासपीठावरच खाली बसले. मनोज जरांगे पाटील यांच्या हाताला अचानक कंपण सुरू झाले. घटनेनंतर तात्काळ मराठा बांधवांनी व्यासपीठावर जावुन त्यांना सावरलं. डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जात आहे. यापूर्वी देखील अनेकदा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
वाचा - बीडच्या सुपारी फेक प्रकरणावर राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 2 नेत्यांची घेतली नाव
साताऱ्यात शांतता रॅलीला तुफान प्रतिसाद
मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज साताऱ्यात दाखल झाली. साताऱ्यातील शिवतीर्थावरून मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी झाले. ही रॅली गांधी मैदान या परिसरात पोहोचल्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर ते खाली बसले.
