Raj Thackeray : बीडच्या सुपारी फेक प्रकरणावर राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 2 नेत्यांची घेतली नावं

Last Updated:

बीड दौऱ्यात राज ठाकरेंच्या दौऱ्यावेळी सुपारी फेकल्याचा प्रकार घडला होता. यावर राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना प्रतिक्रिया दिली.

News18
News18
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाड्यातील दौऱ्याची आज सांगता झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी यानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीडमधील प्रकारावर भाष्य करताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीड दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून आंदोलन केलं गेलं. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याचा दावा केला गेला. दरम्यान, संजय राऊत यांनी आपला याच्याशी संबंध नाही असं सांगितलं. तर राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले की, माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा संबंध नव्हता, पण त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या प्रकारचं राजकारण करत आहेत.
राज ठाकरे म्हणाले की,  तो कालच्या प्रकारातला शिवसेनेचा जिल्हाप्रमुख ओरडत गेला की एक मराठा, लाख मराठा. म्हणजे त्यांना दाखवायचंय की हे जरांगे पाटलांचे लोक आहेत. पण त्यांच्या आडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे. हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. काल जे बीडमध्ये सुपारी फेक प्रकरण झालं त्यात तर शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच होता.
advertisement
बीडची घटना झाली त्यात तीन पत्रकार सापडले. ही कोणती पत्रकारिता आहे. मी दौरा पूर्ण करून मुंबईला गेल्यानंतर बघेन, काय विघ्न आणतात. काल त्यांनी पाठवलेली माणसं नव्हती. ती कोण माणसं होती ते तुम्हालाही माहितीय. जरांगेंसोबतचे आंदोलनकर्ते नव्हते. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सोबतची माणसं होती असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला.
advertisement
राज ठाकरे यांनी म्हटलं की, मराठवाड्याबद्दल मी जे ऐकून होतो ते मला दिसलं. मराठवाड्यातले काही पत्रकारही त्यात सहभागी आहेत. मला त्यांची नावंही माहिती आहेत. ती योग्य ठिकाणी जातीलही. कुणाला पेव्हर ब्लॉकचे काँट्रॅक्ट्स मिळाले, कुणाला एमआयडीसीत जागा मिळाल्या, कुणाला किती पैसे मिळाले, त्यातून कशा गाड्या घेतल्या गेल्या अशा सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Raj Thackeray : बीडच्या सुपारी फेक प्रकरणावर राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 2 नेत्यांची घेतली नावं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement