मी स्वतः एसपींना बोलणार - शशिकांत शिंदे
सातारा येथे शासकीय सेवेत असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यानं महिला डॉक्टर सोबत केलेल्या गैरकृत्याला आणि त्रासाला कंटाळून या महिला डॉक्टरने आत्महत्या केली असून ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. या सर्व घटनेची माहिती घेण्यासाठी मी स्वतः साताऱ्याचे एसपी यांच्याशी संवाद साधणार आहे. या घटनेतील ससत्यता पडताळून कडक कारवाई करण्यासाठी आम्ही प्रशासनाला भाग पाडू, असंही शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.
advertisement
रिपोर्ट बदलले जाणार नाहीत - शशिकांत शिंदे
मृत पीडितेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सतत दबाव येत असल्याचे माध्यमांकडून समजते परंतु याबाबत कोणतेही रिपोर्ट बदलले जाणार नाहीत याबाबत मी स्वतः काळजी घेणार आहोत, असं आश्वासन देखील शशिकांत शिंदे यांनी दिलंय. पोलिसांनी त्वरित या घटनेची निष्पक्षपातीपणे चौकशी करावी आणि आरोपींवर कडक कार्यवाही करून पीडितेला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे, असंही शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.
गोपाल बदने याला कधी अटक होणार?
दरम्यान, महिला डॉक्टर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली होती यामध्ये प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाल बदने यांची नावं लिहिली होती. पीएसआय गोपाल बदने याला कधी अटक होणार असा प्रश्न सुद्धा लोक विचारताना पाहायला मिळत आहे.
