सातारा : आयुष्यात जे लोक संघर्ष करतात त्यांना यश मिळतेच. मोठ्या यशासाठी मोठाच संघर्ष करावा लागतो. याचे उदाहरण म्हणजे साताऱ्यातील सतीश रावखंडे उर्फ सतीश शेंगदाणेवाला. खिशात 22 रुपये असताना सुरू केलेला व्यवसाय त्यांनी आता लाखो रुपयापर्यंत नेला आहे. शेंगदाण्याला ब्रँड बनवण्याचे स्वप्न ऊराशी धरून रात्रीचा दिवस करून सतीश शेंगदाणेवाले यांनी साताऱ्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये आपला खारा शेंगदाणा सुप्रसिद्ध केला आहे.
advertisement
खिशात 22 रुपये असताना सुरु केला व्यवसाय
साताऱ्यातील अतिशय गरीब कुटुंबातील सतीश रावखंडे यांनी 1974 साली खारे शेंगदाणे विक्रीचा व्यवसाय सुरू केला. साताऱ्यातील मल्हार पेठ परिसरामध्ये एका लहानशा बोळात त्यांनी शेंगाविक्री आणि खारे शेंगदाणे विक्रीला सुरुवात केली. हे करत असताना त्यांनी एका वखारीमध्ये देखील काम करण्यास सुरुवात केली. घरची हालाखीची परिस्थिती असल्यामुळे वडील चप्पलच्या दुकानात काम करत होते. आई होस्टेलमध्ये काम करत होती. त्यामुळे आई-वडिलांचे कष्ट पाहून त्यांनी खिशात 22 रुपये असताना हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
टेलरिंग सोडलं अन् गाठली मुंबई, काका लस्सीवाले कसे झाले सातारचे ब्रँड?
व्यवसायचे आता कारखान्यामध्ये रूपांतर
सतीश शेंगदाणेवाले यांनी छोट्याशा बोळामध्ये सुरू केलेला व्यवसायचे आता कारखान्यामध्ये रूपांतर केले आहे. या खारे शेंगदाण्याच्या कारखान्यामध्ये तब्बल 15 कामगार काम करतात. शेंगदाणा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी 6 गाड्या त्यावर ड्रायव्हर्स एकूण मिळून 21 ते 22 जणांचा स्टाफ त्यांच्याकडे कामाला असल्याचं सतीश रावखंडे यांनी सांगितलं आहे.
फक्त 4 तासांत तब्बल 3 हजार रुपयांची कमाई, इंजीनिअर तरुणाला नोकरी न मिळाल्याने घेतला अनोखा निर्णय
वर्षांकाठी 22 ते 24 लाखरुपये उत्पन्न
खारे शेंगदाण्याबरोबर चणे, फुटाणे, वाटाणे, तिखट डाळ, हिरवा वाटाणा, उपवासाची शेंगदाणा चिक्की, राजगिऱ्याचे लाडू याचा देखील व्यापार त्यांनी सुरू केला आहे. यामधून त्यांना वर्षांकाठी 22 ते 24 लाख रुपये उत्पन्न होत असल्याचे सतीश रावखंडे यांनी सांगितलं.





