नेमकं काय म्हणाले उदयनराजे?
यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. मी मागणी केली नाही म्हणून विरोधक टीका करत असतील तर ज्यावेळी पुरस्कार मिळेल त्यावेळी कळेल. यासाठी एक समिती असते. ज्या लोकांनी राजकारणाला दिशा देण्याचं काम केलं, त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे. मी काही यशवंतराव चव्हाण यांचा मानसपुत्र नाही. जे मानसपुत्र आहेत, त्यांच्याकडे सत्ता असताना, त्यांनी आजपर्यंत पुरस्काराची का मागणी केली नाही? असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचं नाव न घेता त्यांना डिवचलं आहे.
advertisement
उदयनराजे यांना यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली होती, ही निवडणूक प्रचंड अतितटीची झाली. मात्र या निवडणुकीत उदयनराजे यांनी अखेर बाजी मारली, ते विजयी झाले. त्यांनी आता पुन्हा एकदा शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
