सातारा : व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी येतात. अनेक अडचणींवर मात करत, जिद्दीने, चिकाटीने आणि स्वतःवर असलेल्या विश्वास ठेऊन काही धाडसी निर्णय घेऊन व्यवसाय सुरू केला जातो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे साताऱ्याच्या उद्योजिका शुभांगी सोनवणे. शुभांगी अंकुश सोनवणे (रा. गोळीबार मैदान) यांनी वैदिक फूड्स या नावाने व्यवसाय सुरू करुन साताऱ्यासह महाराष्ट्रभर आपली वेगळी छाप पाडली आहे. आज जाणून घेऊयात, त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास.
advertisement
लॉकडाऊनमध्ये शुभांगी यांच्या पतीची तब्येत अगदी खालावली होती. त्यांच्या शरीरात विटामिन बी12 ची मोठी कमतरता होती. शुभांगी यांचे पती आणि त्यांचे संपूर्ण घर हे शाकाहारी असल्याने या व्हिटामिनची कमतरता कशी भरून काढावी, यासाठी त्यांनी अनेक तज्ञांचे सल्ला घेतला. त्याचबरोबर युट्युबवरही व्हिडिओ पाहिले. त्यानंतर भरड धान्याचा एक व्हिडिओ युट्युबवर पाहिला. यावरुन त्यांना भरड धान्यापासून शरीरातील व्हिटामिन वाढवता येते, असे समजले.
त्यानंतर त्यांनी आपल्या पतीसाठी रायाची बिस्किट, नाचणीची बिस्किट तयार करून त्यांना खाण्यास दिले. त्यातून त्यांची तब्येत सुधारली. जर आपल्या घरातील लोकांना हे खायला दिल्यानंतर याचे अनेक फायदे मिळत आहेत, तर याचाच व्यवसाय केल्यावर अनेकांना विटामिन, न्यूट्रिशन या भरड धान्यापासून मिळेल आणि त्यांच्या अनेक अडचणी दूर होतील, असा विचार त्यांच्या मनात आला.
यानंतर शुभांगी अंकुश सोनवणे यांनी पतीच्या आजारपणासाठी घरी तयार केलेल्या बिस्किटांपासून आपला भरड धान्यांपासूनचा बिस्कीट तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. महिन्याला 5 लाख रुपये त्यांना या व्यवसायातून मिळतात. तर हा व्यवसाय त्यांना वर्षाला लाखो रुपये कमवून देत आहे.
health tips in marathi : रात्री झोपण्यापूर्वी अजिबातच हे पदार्थ खाऊ नयेत, डॉक्टरांचं ऐकायला हवं
कशी झाली सुरुवात -
त्यांनी युट्युब वरून माहिती घेत हैदराबादच्या येथील संस्थेच्या मुंबई ब्रांचमध्ये तिथे जाऊन प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि व्यवसायाला सुरुवात केली. अनेक मशनरी लागतील, यासाठी प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया योजना यातून 5 लाखांचे लोन घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. यांच्या वैदिक फ्रुट्समध्ये मैद्याचा वापर न करता बिस्किटे तयार करण्यात येतात.
हे बिस्किटे तयार करताना ड्रायफूट पावडर, देशी गुळ, देशी गाईचे तूप हे तिन्ही प्रकार एकत्र करून गुळापासून या वेगवेगळ्या कुकीज, ग्लूटीन फ्री कुकीज बनवायला सुरुवात केली. वैदिक कुकीज म्हटलं की, प्युअर हेल्दी प्युअर नॅचुरल प्युअर व्हिटामिनचे बिस्किट म्हणून या वैदिक कुकीज ब्रँड प्रसिद्ध झाला आहे.
या भरड धान्यापासून तयार केलेल्या बिस्किट लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत करता येत आहे. त्याचबरोबर शुगर बीपी असणाऱ्या नागरिकांनाही या बिस्किटांचा वापर करता येत आहे, असेही वैदिक कुकीज संस्थापिका शुभांगी सोनवणे यांनी सांगितले. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.