७० वर्षी महिलेबाबतीत घडलेला हा प्रकार म्हणजे निसर्गाचा एक दुर्मीळ चमत्कार आहे. तातडीने केलेल्या तपासणीत डॉक्टरांच्या लक्षात आले की, या महिलेचे हृदय आपल्या सर्वांसारखे डाव्या बाजूला नसून चक्क उजव्या बाजूला आहे! वैद्यकीय भाषेत याला 'डेक्स्रोकार्डिया असे म्हणतात. वयाच्या ७० व्या वर्षी हे गुपित उघड होण्याची ही भारतातील पहिलीच तर जगातील तिसरी किंवा चौथी घटना असावी, असा दावा डॉक्टरांनी केला आहे.
advertisement
भारतातील पहिलीच घटना
वयाच्या ७० व्या वर्षी उजव्या बाजूला हृदय असल्याचे निदान झालेली ही जगातील तिसरी किंवा चौथी तर भारतातील पहिलीच घटना असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. या महिलेच्या हृदयाची मुख्य रक्तवाहिनी ९० टक्के बंद झाली होती. हृदय उजव्या बाजूला असल्यामुळे ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती, मात्र तज्ज्ञांनी अत्यंत कौशल्याने अँजिओप्लास्टी केली आणि स्टेंट टाकून रक्तप्रवाह पूर्ववत केला.
शस्त्रक्रियेसाठी एक तास लागला
ही शस्त्रक्रिया करण्याआधी रक्त पातळ करणारी औषधे, वेदनाशामक औषध द्यावी लागली. या शस्त्रक्रियेसाठी एक तासाचा वेळ गेला. हे करणं मोठं आव्हान होतं. तज्ज्ञांनी यशस्वी अँजिओप्लास्टी केली.डॉ. हितेंद्र भागवतकर यांच्या मते, आपल्या देशात अशा प्रगत वयातील रुग्ण आतापर्यंत आढळलेला नाही. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या महिलेला नवे आयुष्य मिळाल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
काय आहे डेक्स्रोकार्डिया अवस्था?
वैद्यकीय भाषेत या दुर्मिळ स्थितीला डेक्स्रोकार्डिया असं म्हणतात. आईच्या पोटात बाळ असताना ही अवस्था तयार होते. साधारणतः ९ ते १८ आठवड्यांच्या कालावधीमध्ये ही अवस्था होते. जैविक बदल किंवा अनुवंशिक घटकांमुळे भ्रूणातील हृदयाची दिशा बदलते आणि ते उजव्या बाजूला विकसित होतं. अशा व्यक्तींची हाडे ठिसूळ असू शकतात आणि त्वचेचा रंग पांढरट असतो. ही स्थिती लाखो लोकांमध्ये एखादा रुग्णामध्ये आढळते.
