धाराशिव खुंटेवाडी परिसरात भूसंपादनावरून तणाव कायम आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी मोठा पोस्ट फाटा घेऊन महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी आज जमिनी संपादित करण्यासाठी दाखल झाले. कालच राज्य शासनाने या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिल्यानंतर व संपादनाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रशासन दाखल झाले. मात्र परिसरातील शेतकऱ्यांनी मोजनी करणाऱ्याला अधिकाऱ्यांना विरोध केल्यामुळे शेतकरी पोलिसात वाद झाला. या वादात पोलीस आणि शेतकर्यांमध्ये झटापट झाली. या झटापटीत शेतकरी 4 शेतकरी जखमी झाले आहेत. तर, काही पोलिसही जखमी झाले आहेत. महसूल विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित आहेत. शेतकरी मात्र जीव गेला तरी भूसंपादन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला.
advertisement
जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी...
शक्तिपीठ महामार्गाचा वाद पेटल्यानंतर शेतकरी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमले. शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीनंतर या महामार्गाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या झटापटीविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी घोषणाबाजी केली. कोणत्याही परिस्थितीत जमिनीची मोजणी होऊ देणार नसून पोलीस आणि अधिकाऱ्यांनी शेतातून निघून जावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सांगलीत अधिकाऱ्यांचा मार्ग रोखला...
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगलीच्या आटपाडीतील शेटफळे येथे शेतकऱ्यांनी रोखून धरले. संतप्त शेतकऱ्यांकडून भूसंपादनाच्या मोजणी प्रक्रियेला जोरदार विरोध करण्यात आला कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही,अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सकाळ पासून थांबून राहावे लागले आहे.
राज्य सरकारकडून शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी देत निधीची तरतूद करण्यात आलेली आहे,यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनासाठी सांगलीमध्ये प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र आटपाडीतल्या शेटफळे या ठिकाणी पोलीस फौजफाटा घेऊन पोहोचलेल्या भूसंपादन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले आहे.