त्याचं झालं असं की, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नातीचा प्री- वेडिंग सोहळा होतं. त्यांची नात दिया श्रॉफ हिचा प्री-वेडिंग सोहळा मुंबईमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. या प्री-वेडिंग सोहळ्याला महाराष्ट्राच्या राजकारणातले बडे दिग्गज मंडळी उपस्थित होते. शिवाय, व्यावसायिक विश्वातील सुद्धा दिग्गज मंडळी यावेळी उपस्थित होते. नेते सुशीलकुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफ हिचा लग्न मिहिर माधवानी याच्यासोबत पार पडणार आहे. दिया आणि मिहिर यांचा विवाहपूर्वीच्या सोहळ्याला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती.
advertisement
शिंदे आणि पवार दोघेही वेगवेगळे पक्षातील नेते आहेत. असं असलं तरीही त्यांची मैत्री संपूर्ण राज्याला ठाऊक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिंदे आणि पवार कुटुंबातील मैत्री आहे. नेते शरद पवार यांनी काही तासांपूर्वी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये पवार आणि शिंदे कुटुंबीय एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. एका बाजूला सख्खे मित्र आहेत तर दुसऱ्या बाजूला सख्ख्या मैत्रिणी आहेत. सख्ख्या मैत्रिणी म्हणजे शरद पवार यांच्या पत्नी आणि सुशील कुमार यांच्या पत्नी एका बाजूला आहेत. सोशल मीडियावर खास चर्चा मित्रांची नाही तर या माजी मिसेस मुख्यमंत्री दोन मैत्रिणींची सध्या जोरदार सुरू आहे
शरद पवार यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये, शरद पवार यांनी सपत्नीक वधू-वरासोबत फोटो काढला. त्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. फोटोमध्ये शरद पवार यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, उद्योगपती गौतम अदानी आणि शिंदे कुटुंबीय आहेत. फोटोमध्ये लक्षवेधी ठरल्या त्या शेजारी- शेजारी उभ्या राहिलेल्या सख्ख्या मैत्रिणी प्रतिभा पवार आणि उज्ज्वला शिंदे. एकमेकींचा हात हातात घेऊन उभ्या राहिलेल्या या दोघींचा फोटो त्यांच्यातील जवळीकीची साक्ष देतोय.
या दोघीही शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे जेव्हा त्यांच्या कामात व्यग्र असायचे तेव्हा या दोघीही मैत्रिणी एकत्र फिरायला जायच्या. अनेक ठिकाणी या दोघीही एकत्र फिरायला गेल्या आहेत. 'मिसेस मुख्यमंत्री' यांची मैत्री मुरलेल्या मुरांब्यासारखी आहे.
