TRENDING:

सरकार पडल्यावर वानखेडेवर मॅच पाहिली, महापालिकेला अपयश, शरद पवारांनी नातवाचा सामना TV वर पाहिला

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नातू, खासदार सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे हा एक उदयोन्मुख बास्केटबॉल खेळाडू म्हणून ओळखला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे १९८० साली राज्यातले सरकार बरखास्त झाल्यानंतर त्यांनी वानखेडे स्टेडिअमवर जाऊन सामना पाहिल्याचा किस्सा अनेक जण रंगवून सांगतात. सत्ता गेल्यानंतर अस्वस्थ न होता भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याचा आनंद शरद पवार यांनी घेतला. ही आठवण पुन्हा ताजी होण्याचे कारण म्हणजे आताही महापालिका निवडणुकीत प्रचंड अपयश आल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या नातवाचा बास्केटबॉलचा सामना टीव्हीवर पाहिला. हा विशेष व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केला.
शरद पवार-विजय सुळे
शरद पवार-विजय सुळे
advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नातू, खासदार सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे हा एक उदयोन्मुख बास्केटबॉल खेळाडू म्हणून ओळखला जातो. देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने आपल्या खेळाची छाप पाडली आहे. सध्या थायलंडमध्ये सुरू असलेल्या प्रतिष्ठित वॉरियर्स लीग बास्केटबॉल स्पर्धेत विजय सुळे सीएनएक्स ओरीऑन या संघाकडून मैदानात उतरला आहे.

advertisement

पवार-सुळे कुटुंबाने विजयचा सामना टीव्हीवर पाहिला

या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ विशेष चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये शरद पवार, प्रतिभा पवार आणि विजयचे वडील सदानंद सुळे एकत्र बसून विजयचा सामना पाहताना दिसत आहेत. आपल्या नातवाचा आंतरराष्ट्रीय सामन्यातील खेळ पाहताना शरद पवार आणि प्रतिभा पवार यांना आनंद झाला होता.

विजय सुळे यापूर्वी अमेरिकेत आपल्या कॉलेजच्या संघाकडून विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाला होता. परदेशात जाण्यापूर्वी त्याने भारतातही अनेक राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. विजय सुळे याला लहानपणापासूनच बास्केटबॉलची आवड आहे. सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटचाल सुरू केली आहे.

advertisement

दरवर्षी थायलंडमध्ये आयोजित होणारी वॉरियर्स लीग ही स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. या लीगमधून आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलच्या स्पर्ध्यांमध्ये संधी मिळण्याचे दार खुले होते. यंदाच्या हंगामात विजय सुळे याचा या मानाच्या स्पर्धेत सहभाग असणे ही त्याच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे.

advertisement

सरकार पडल्यावर वानखेडेवर मॅच पाहिली

शरद पवार यांचे महाराष्ट्र राज्यातील सरकार १९८० साली तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त केले. या गोष्टीचे शरद पवार यांना प्रचंड वाईट वाटले. परंतु सत्ता गेल्यानंतर त्यांनी अस्वस्थ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर घसरले, कांदा आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

न होता भारत इंग्लंड यांच्यातील वानखेडे मैदानावरील सामना पाहिला. ही आठवण ते अनेकदा सांगत असतात. सत्ता येत जात असते, आपण त्यातून काय शिकतो हे महत्त्वाचे असते, असेही तरुण नेत्यांना शरद पवार सांगतात.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सरकार पडल्यावर वानखेडेवर मॅच पाहिली, महापालिकेला अपयश, शरद पवारांनी नातवाचा सामना TV वर पाहिला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल