समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात ठाकरे गटाच्या बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरबाजीच्या प्रकरणात रमेश तिखे यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती आहे. या तक्रारीनंतर पोलिसांकडून तिखे यांना वारंवार पोलिस ठाण्यात बोलावण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर काल घडलेल्या घटनेनंतर त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या कारवाईविरोधात संताप
ठाकरे गटाने आरोप केला आहे की, पोलिसांनी टाकलेल्या मानसिक दबावामुळेच रमेश तिखे यांचा मृत्यू झाला. पोस्टर प्रकरणात पोलिसांनी अनावश्यकपणे टिके यांना वारंवार बोलावून त्रास दिला. यामुळेच ते मानसिक तणावात होते आणि यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचागंभीर आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर पक्षाचे अनेक कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलिसांच्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
कार्यकर्त्यांमध्ये शोककळा
दरम्यान, या प्रकरणामुळे कल्याण पूर्वेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनीही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. रमेश तिखे हे पक्षात सक्रिय आणि आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक मृत्यूने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे गटाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन हे नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर शहरात चिटकवले होते. याप्रकरणी मधुर म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस या तक्रारीनंतर ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशीसाठी येण्याकरता दबाव टाकत होते. या दबावामुळेच ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांची तब्येत बिघडली कधी झाला त्यांचा आणि त्यांचा आज पहाटे हृदयविकाराने मृत्यू झाला.
प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
पोलिसांनी मात्र आरोप फेटाळून लावत सांगितले आहे की, प्रकरणाची चौकशी कायद्याच्या चौकटीतच करण्यात आली होती. सध्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास प्रक्रिया सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतरच अधिकृत माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :
