TRENDING:

...तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Last Updated:

"सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कोसळला नसता"

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात सिंधुदुर्गतील राजकोट किल्ल्यावर असलेला शिवाजी महाराजांचा 28 फुटी ब्राँझचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. याबाबत विविध राजकीय पक्षांचे नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सत्ताधारी पक्षाचे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही आता एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
News18
News18
advertisement

"सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कोसळला नसता," असं गडकरी मंगळवारी म्हणाले. किनारपट्टी भागात गंज-प्रतिरोधक उत्पादने वापरण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला.

राजकोट पुतळा कोसळल्याचे खरे सूत्रधार फडणवीसच, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

एफआयसीसीआयच्या एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, "गेल्या तीन वर्षांपासून समुद्राजवळ बांधलेल्या पुलांच्या बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, यावर मी भर देत आहे. कारण मी (राज्यमंत्री असताना) मुंबईत 55 उड्डाणपुलांचे बांधकाम प्रकल्प हाती घेतले होते.

advertisement

तेव्हा एका व्यक्तीने मला सोबत नेलं होतं. त्याने लोखंडी रॉड्सवर काही पावडर टाकली आणि ती गंज-प्रुफ असल्याचं सांगितलं होतं. पण, ती पावडर वापरूनही गंज चढला आहे. आता मला वाटतं की, समुद्रापासून 30 किमी अंतरावरील सर्व रस्त्यांवरील पुलांच्या बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर करणं गरजेचं आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कधीच कोसळला नसता."

advertisement

'पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यामुळे शिवरायांचा पुतळा पश्चिमेकडेच कसा कोसळला?' जरांगेंना वेगळाच संशय!

पुतळ्याच्या शिल्पकाराविरोधात लूकआउट नोटीस

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूकआउट नोटीस जारी केली आहे. आपटे आठवडाभरापासून बेपत्ता आहे. गेल्या आठवड्यात मालवण पोलिसांनी आपटे आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर चेतन पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला. पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

advertisement

एबीपीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शिवाजी महाराजांचा हा पुतळा तयार करण्यासाठी तब्बल 2 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च झाला होता. गेल्या वर्षी (2023) पंतप्रधान मोदी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. मात्र, आठ महिन्यांमध्ये हा पुतळा पडला.

समोर आलेल्या माहितीनुसार, या पुतळ्याच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेले नटबोल्ट गंजले होते. याबाबत सार्वजनिक विभागाने नौदलला माहिती दिली होती. कारण, हा पुतळा नौदलाने उभारला होता. पण, नौदलाकडून कोणतीही पावलं उचलली गेली नाहीत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल