राजकोट पुतळा कोसळल्याचे खरे सूत्रधार फडणवीसच, संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महाविकास आघाडीचे समर्थक, कार्यकर्ते आज मुंबईसह इतर ठिकाणी आंदोलन करत आहे. आंदोलनकर्त्यांची अडवणूक केली जात आहे.
मुंबई : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण जास्त तापल्याचं पाहायला मिळालं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आज राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.
महाविकास आघाडीचे समर्थक, कार्यकर्ते आज मुंबईसह इतर ठिकाणी आंदोलन करत आहे. आंदोलनकर्त्यांची अडवणूक केली जात आहे. लोकशाहीत असं होत नाही असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टार्गेट करत तिखट स्वरात प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली.
संजय राऊत काय म्हणाले?
तुमच्या काळात त्यांचा जेवढा अपमान झाला तेवढा ब्रिटिशांनीही केला नसेल
advertisement
किती भीती आहे त्यांच्या मनात शिवरायांबद्दल?
ट्रेन बंद केल्या, जिथून आमचे कार्यकर्ते निघालेत त्या बसेस अडवल्या जात आहेत
तुम्ही पश्चिम बंगालची गोष्ट करताय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत
अटक केली तरीसुद्धा आंदोलन करणार संजय राऊत यांची ठाम भूमिका
भ्रष्टाचारातून हा पुतळा कोसळला आहे- संजय राऊत
तुम्ही महाराष्ट्राचे खलनायक आहात, नेहमी तुमचं नाव खलनायक म्हणूनच घेतलं जाईल - संजय राऊत
advertisement
तुम्ही जो अपराध केलाय त्याविरोधात लोक आवाज उठवू शकत नाहीत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही आंदोलन करतोय तर अडवलं जात आहे
आम्ही फक्त जोडे मारो आंदोलन करतोय महाराज असते तर कडेलोट केला असता- राऊत
महाराष्ट्रातून भाजपचा संपूर्ण नायनाट होईल - संजय राऊत
आमच्या कार्यकर्त्यांना अडवलं जातंय- संजय राऊत
advertisement
फडणवीस यांना फक्त पुतळ्याविषयी राजकीय प्रेम आहे - संजय राऊत
याचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीसफडणवीस आहेत- राऊत
माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही, लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे आंदोलनाचा - राऊत
तुम्हाला शिवाजी महाराज्यांच नाव घेण्याचा अधिकार नाही - राऊत
ते सत्तेत नव्हते तेव्हा त्यांना विदर्भ वेगळा करायचा होता, ते देवेंद्र फडणवीस आम्हाला सांगतात
advertisement
भाजपचे राज्यपाल भवनात बसून अपमान करत होते तेव्हा तुम्ही गप्प बसलात
तुमचेच एक मंत्री कर्नाटकात जाऊन इथेच जन्म घ्यावा वाटेल असं सांगतात, हा अपमान नाही - संजय राऊत यांना तिखट सवाल
मालवण पुतळा प्रकरणी मविआ आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीचं आज जोडेमारो आंदोलन करण्यात येणार आहेत. हुतात्मा चौक ते गेटवेपर्यंत आंदोलन असेल. या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोर्चाला अद्याप पोलिसांकडून परवानगी नाही तरीही आंदोलनावर कार्यकर्ते ठाम आहेत.
advertisement
मालवणमधील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केलं जाणार आहे. यात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन केलं जाईल. मोर्चाला अजूनही पोलिसांकडून परवानगी नाही, मविआचे मोठे नेते आंदोलनात उतरणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2024 10:53 AM IST