TRENDING:

लाडक्या लेकीच्या विवाह सोहळ्यात सामाजिक बांधिलकीचं दर्शन, मन जिंकणारा शिवेंद्रराजेंचा निर्णय

Last Updated:

शिवेंद्रराजे भोसले यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तुषार रुपनवर, प्रतिनिधी, सातारा : सातारा येथे पार पडलेल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक अत्यंत अभिनंदनीय पाऊल उचलून सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले.
शिवेंद्रराजे भोसले धनादेश मुख्यमंत्र्यांना देताना....
शिवेंद्रराजे भोसले धनादेश मुख्यमंत्र्यांना देताना....
advertisement

शिवेंद्रराजे यांची कन्या ऋणालीराजे भोसले आणि चिरंजीव रविराज देशमुख यांच्या शुभविवाह प्रसंगी, त्यांनी लातूर जिल्ह्यातील ओल्या दुष्काळग्रस्तांसाठी १० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. शेंद्रे, सातारा येथील अजिंक्यतारा साखर कारखाना परिसरात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

advertisement

याप्रसंगी, भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना दहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला, जो लातूरमधील ओल्या दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून वापरला जाईल. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांदा आणि सोयाबीनच्या भावात पुन्हा चढ-उतार, मक्याला किती मिळाला आज भाव?
सर्व पहा

लग्नासारख्या कौटुंबिक आणि आनंददायी सोहळ्याच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या लातूर जिल्ह्यातील जनतेसाठी हा निधी मोठा आधार ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लाडक्या लेकीच्या विवाह सोहळ्यात सामाजिक बांधिलकीचं दर्शन, मन जिंकणारा शिवेंद्रराजेंचा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल