राजस्थान मध्ये 26 जागा आहेत आणि एका एक्झिट पोल कंपनीने तिथे भारतीय जनता पक्षाला 33 जागा दाखवल्या. आता मला असं वाटलं की हे सर्व मिळून भारतीय जनता पक्षाला 800 ते 900 जागा देतील. आणि ती शक्यता आहे. कारण मोदींनी ध्यान केलं आहे. इतके वेळ ते ध्यानाला बसले. कॅमेरे लाव,ले साधना केली, तपस्या केली त्यामुळे 360-370 म्हणजे काहीच नाही. अशा तप आणि ध्यानस्थ माणसाला किमान 800 जागा मिळाल्या पाहिजे तरच ते ध्यान मार्गी लागलं असं बोलू शकतो अशा शब्दात संजय राऊत यांंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकाही केली.
advertisement
काँग्रेसचं कमबॅक नाहीच! फिर एक बार मोदी सरकार? मिशन 400 चं काय?
अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा पोल आहे. ओपनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षात चुकीचे ठरतात. भारतीय जनता पक्ष या देशात गृह मंत्रालय आणि ते यंत्रणा कशाप्रकारे याच्यावर दबाव टाकते ते सर्वांना माहिती आहे. काल जयराम रमेश यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला गेल्या 24 तासात गृहमंत्री अमित शहा यांनी देशभरातल्या किमान 180 डिस्ट्रिक मॅनेजमेंट आणि कलेक्टरला फोन करून जवळजवळ धमकावला आहे. आणि या धमक्या कशा करता है ते मी सांगण्याची गरज नाही असं संजय राऊत म्हणाले.
देशात इंडिया आघाडी सरकार बनवेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. ते म्हणाले की, तुम्हाला जिंकण्याची खात्री असेल तर सहज ध्यान, तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही. अशाप्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाही. इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणार 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं एक्झिट पोलचं आहे. मोठे मोठे जे पक्ष आहेत ते सत्तेवरती ते पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणतात. हा आतापर्यंत गेल्या दहा वर्षातला हा सर्व पैसा फेको तमाशा देखो असा पोल आहे. आमचा विश्वास नाही आम्ही त्याच्यावर बोलणार नाही.
Exit Poll म्हणजे काय रे भाऊ? आकडे येतात कुठून? जाणून घ्या 8 प्रश्नांची उत्तरं
महाराष्ट्रात महाविकास आघाडी हे 35 अधिक इतक्या जागा मिळेल. या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे त्यांच्या मनात काय आहे हे सॅम्पल सर्वे दूर करत नाही. गेले काही दिवस मी ऐकत होतो बारामती मध्ये सुप्रियाताई यांचा पराभव होणार आणि आम्ही खात्रीने सांगत होतो सुप्रियाताई सुळे किमान दीड लाखा मताने जिंकेल. शिवसेनेचा 18 चा आकडा कायम राहील. काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स राहील आणि देशामध्ये उत्तर प्रदेश बिहार दिल्ली आणि हरियाणा महाराष्ट्र कर्नाटक हे राज्य देशांमध्ये परिवर्तन घडवतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
माझा या सर्व अंधश्रद्धावरती विश्वास नाही त्यामुळे आम्हाला तपस्याला आम्हाला बसावं लागेल. तपस्येतून जो आकडा दिसेल तो मला सांगावा लागेल. आम्ही किमान 30 ते 35 जागा जिंकत आहोत त्यासाठी एक्झिट पोलची गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. माननीय उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला. त्यामुळे लोकांचा कल आहे त्याला तुम्ही अंडर करंट म्हणता तो करंट आम्हाला माहिती आहे. त्या करंट साठी आम्हाला तपस्या आणि कॅमेरे लावून बसावं लागायची गरज नाही असं म्हणत पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर राऊतांनी टीका केली.
आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे विदर्भात काय निकाल लागत आहे. पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागत आहे, कोणत्या अपक्ष जिंकत आहे हे आम्हाला माहिती आहे. प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे. आम्ही इकडे गोट्या खेळायला बसलो नाही आहोत. आमचे देखील आयुष्य राजकारणात समाजकार्यात गेला आहे. महाराष्ट्राचे निकाल हे धक्कादायक आश्चर्यकारक लागणार नाहीत. जे लोकांच्या मनात आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत तेच निकाल लागतील. उत्तर प्रदेश मध्ये इंडिया आघाडी 35 ते 40 जागा जिंकतील हा खरा एक्झिट पोल आहे. आरजेडी 16 जागा जिंकत आहे बिहारमध्ये तेजस्वी यादव कर्नाटका यावेळी उलटफेर मोठ्या प्रमाणात होत आहे.