फडणवीस हे महाराष्ट्रातील पुरुष आनंदीबाई आहेत. लोकांनी त्यांना दाखवलं की तुमचं हे फडतूस राजकारण आहे. अशी माणसं संयुक्त महाराष्ट्रात राज्यद्रोहीदेखील होती. न्यायमूर्तींना घरी बोलावून धमकी देण्याचा प्रयत्न फडणवीस आणि त्यांच्या टोळीने केला. याचा उद्रेक हा होतोच. जितका राग मोदी शहा यांच्यावर नाही तेवढा राग फडणवीस यांच्यावर राज्यात आहे. भाजप राज्यात रसातळाला गेलाय. त्याला फडणवीस जबाबदार आहेत. आमच्यावर कारवाई करण्यापेक्षा स्वत:च्या घरात काय सुरू हे पाहिलं पाहिजे असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.
advertisement
अनेक जण तुरुंगात आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्ते तुरुंगात गेले. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मिळालेला विजय ही तर सुरुवात आहे. मी पुन्हा येईन सांगणारे जे पक्ष फोडून केलं तेच आता तुमच्यावर अश्रू ढाळत आहेत. मिस्टर फडणवीस, महाराष्ट्राच्या इतिहास तुमचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल असंही राऊतांनी म्हटलं.
भाजपबाबत विचारताच राऊत म्हणाले की, त्यांनी त्यांच्या पक्षात झक मारावी, भांडी घासावी. त्यांनी दळभद्री राजकारण केलं. जनतेने त्यांना घरी बसवलं. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही. ज्या रुबाबात ५६ इंच छाती होती तो रुबाब आता दिसत नाही. नरेंद्र मोदी यांचा पराभव झालाय. पराभूत माणूस पंतप्रधान कशा होऊ शकतो? भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही.
एनडीएने त्यांच्या पक्षांमध्ये मतदान घ्यावं, मोदी पंतप्रधान हवेत का विचारावं? मोदींना पक्षातूनच विरोध आहे. आमच्यासारखे लोक मरायला तयार आहेत. आरएसएस टॉप लीडरशीप ही पर्यायी पंतप्रधान कोण असावा याची चाचपणी करत आहेत. ही माझी माहिती आहे. मोदी शहा यांनी संघालाच गुलाम करण्याचं काम केलं. त्यामुळे आता संघ आपला पर्याय शोधत आहे असं राऊतांनी म्हटलं.
महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं असून विधानसभेत आणखी मोठं यश मिळेल असा विश्वास राऊतांन व्यक्त केला. राऊत म्हणाले की, अमोल किर्तीकर यांची जागा चोरण्याचा प्रयत्न झाला. विधानसभा निवडणुकीत आम्ही १८० पर्यंत जाणार आहे. मी माझी भूमिका संताप व्यक्त केला आहे. आधी महाराष्ट्र... राज्याच्या मुळावर कोणी येत असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात जाणार. त्यांनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली. सेशन कोर्टच्या न्यायाधीशांना घरी बोलावून धमकी दिली गेली. आमची लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे. आमची भूमिका ही इंडिया आघाडीसोबत राहणं आणि आम्हाला ज्यांनी मतदान केलं त्यांचा विशास न तोडणं ही राहील.