बैलपोळा सणानिमित्त सोलापूरमधील बाजारपेठ रंगबेरंगी साहित्यांनी सजली आहे. मोहोळ तालुक्यामध्ये देखील आठवडी बाजारांमध्ये व दुकानात बैलांच्या सजावटीचं साहित्य विक्रीसाठी आणलं आहे. इंगुळ, कासर, कवडी माळ, तोडे आधी साहित्याने दुकानं सजली आहेत.
पोळ्याच्या दिवशी बैलांना आंघोळ घालून त्यांची शिंगे रंगवली जातात. त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते. त्यांच्या पायात तोडे आणि गळ्यामध्ये घुंगरांची माळ घातली जाते. बैलांना सजवल्यानंतर त्यांची गावातून मिरवणूक निघते. शेतात राबणारे बैल हे बळीराजासाठी फार महत्त्वाचे असतात. ते आपल्या मालकाच्या बरोबरीने कष्ट करतात. म्हणून शेतकरी देखील पोळ्याच्या दिवशी बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात.
advertisement
सोलापूरमधील व्यावसायिक दीपक माने यांनी लोकल 18शी बोलताना सांगितलं की, बळीराजा आपल्या लाडक्या बैलांना सजवण्यासाठी बाजारपेठमध्ये साहित्य खरेदीसाठी गर्दी करत आहे. बैलपोळा सणानिमित्त आठवडाभरामध्ये बाजारात पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक उलाढाल होऊ शकते.





