TRENDING:

Solapur- Mumbai: 16 वर्षांनी सोलापूरकराचं स्वप्न पूर्ण; आता 70 मिनिटात गाठता येणार मुंबई, किती रुपये मोजावे लागणार?

Last Updated:

सोलापूर-मुंबईसोबतच सोलापूर ते बंगळुरू या विमानसेवेचाही आजपासून शुभारंभ झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोलापूरकरांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. तब्बल 16 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सोलापूर ते मुंबई या बहुप्रतिक्षित विमानसेवेचा आज (बुधवारी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे. 2009 मध्ये किंगफिशर एअरलाइन्सने सेवा खंडित केल्यानंतर, आता 2025 मध्ये स्टार एअरलाइन्स ही सेवा देणार आहे. सोलापूर-मुंबईसोबतच सोलापूर ते बंगळुरू या विमानसेवेचाही आजपासून शुभारंभ झाला आहे.
News18
News18
advertisement

संजय घोडावत ग्रुपची विमान वाहतूक शाखा असलेल्या स्टार एअरने सोलापूर–मुंबई थेट उड्डाणांची घोषणा केली आहे. यामुळे सोलापूर हे त्यांच्या वाढत्या हवाई वाहतूक सेवेचे 31वे स्थानक ठरणार आहे. ही सेवा आज पासून सुरू होणार आहे. या विमानसेवेचे प्रारंभीचे भाडे फक्त 3,999 रुपये इतके असणार आहे. या हवाई सेवेचे पहिले उड्डाण मुंबई विमानतळावरुन होणार असून त्याचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

advertisement

आठवड्यातून चार दिवस असणार 'ही' सेवा

ही सेवा आठवड्यातून चार दिवस मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असणार आहे. या मार्गामुळे व्यावसायिक तसेच पर्यटकां साठी अधिक सोयीस्कर होणार असून, प्रादेशिक आर्थिक विकासालाही या मुळे चालना मिळणार आहे.

  • फ्लाइट S5 333: मुंबईहून दुपारी 12:50 ला सुटेल, सोलापूरला 02:10 ला पोहचणार आहे.
  • advertisement

  • फ्लाइट S5 334: सोलापूरहून 02:40 ला सुटेल, मुंबईला 03:45 ला पोहचणार आहे.

स्टार एअरच्या चीफ कमर्शियल अँड मार्केटिंग ऑफिसर शिल्पा भाटिया म्हणाल्या की , सोलापूरला आमच्या वाढत्या नेटवर्क मध्ये सामील करण्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रादेशिक हवाई संपर्क योजनेस मिळालेल्या ठोस पाठिंब्यामुळे हे मार्ग शक्य झाले आहे. सोलापूर हे उद्योग, शिक्षण व संस्कृतीचे केंद्र असून या नव्या सेवेमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, तसेच मुंबईशी व्यापारी व पर्यटन क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होतील.

advertisement

तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भाऊबीजची शॉपिंग करताय? 350 रुपयांत मिळतायत 3-पीस कॉटन ड्रेस, हे आहे लोकेशन
सर्व पहा

या नव्या जोडणीनंतर स्टार एअर आपले प्रादेशिक विमान वाहतुकीचे जाळे अधिक विस्तारत असून प्रवाशांना आरामदायी आणि सहज प्रवासाचा अनुभव देत आहे. तिकिटे आता एअरलाइन वेबसाइट आणि ट्रॅव्हल पार्टनर्सद्वारे विक्रीसाठी खुली आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur- Mumbai: 16 वर्षांनी सोलापूरकराचं स्वप्न पूर्ण; आता 70 मिनिटात गाठता येणार मुंबई, किती रुपये मोजावे लागणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल