TRENDING:

आजोबांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी गेला, पण मृत्यूनं गाठलं, सोलापूरमधील चिमुकल्यासोबत नेमकं काय घडलं?

Last Updated:

स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावरील तुटलेले आणि जीर्ण अवस्थेतील लोखंडी गेट अचानक अंगावर कोसळल्याने अलफैज युसूफ पठाण वय 6 या निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव रोड परिसरातील मुस्लीम स्मशानभूमीत आजोबांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय चिमुकल्यावर काळाने घाला घातला. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावरील तुटलेले आणि जीर्ण अवस्थेतील लोखंडी गेट अचानक अंगावर कोसळल्याने अलफैज युसूफ पठाण वय 6 या निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
आजोबांच्या कबरीला आलेल्या चिमुकल्यावर गेटाचा घाला, स्मशानभूमीत मृत्यू
आजोबांच्या कबरीला आलेल्या चिमुकल्यावर गेटाचा घाला, स्मशानभूमीत मृत्यू
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, अलफैज हा घराजवळ असलेल्या मुस्लीम स्मशानभूमीत आपल्या आजोबांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी गेला होता. दर्शन करून परत येत असताना प्रवेशद्वारावरील जीर्ण आणि सैल अवस्थेतील लोखंडी गेट अचानक त्याच्या अंगावर कोसळले. या अपघातात अलफैज गंभीर जखमी झाला.

MHADA Pune lottery : अखेर घराचं स्वप्न पूर्ण होणार, पुण्यातील म्हाडाच्या 4186 घरांची सोडत, तारीख आली समोर

advertisement

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन त्याला जवळील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अलफैजला मृत घोषित केले. या घटनेमुळे पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे अलफैजचे वडील युसूफ पठाण हे एका हॉटेलमध्ये मजुरीचे काम करतात. पाच मुलींनंतर जन्मलेला अलफैज हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. संपूर्ण कुटुंब, नातेवाईक व परिसरातील नागरिकांचा तो लाडका होता.

advertisement

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अलफैजच्या पश्चात आई-वडील व पाच बहिणी असा परिवार असून, गरीब कुटुंबावर ओढवलेल्या या संकटानंतर प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव (देशमुख) शिवारातील अपघात 

अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव–बोरगाव (देशमुख) रस्त्यावर ओढ्याच्या पुलाजवळ भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने चालत जाणाऱ्या तरुणास पाठीमागून जोराची धडक दिल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अयान रेहमान मुल्ला (वय 19 राहणार बोरगाव देशमुख, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 11:15 वाजता घडली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

धडकेनंतर ट्रॅक्टरचे चाक अयानच्या डोक्यावरून गेल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. या प्रकरणी मयताचा वडील रेहमान खासीम मुल्ला यांनी अक्कलकोट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. असून अपघातातील ट्रॅक्टर क्रमांक एमएच 13 एएक्स 3836 असून चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. फरार ट्रॅक्टरचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कोळी करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
आजोबांच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी गेला, पण मृत्यूनं गाठलं, सोलापूरमधील चिमुकल्यासोबत नेमकं काय घडलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल